एसटी आणि टेम्पोचा भिषण अपघात; एक ठार, बारा जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

मराठवाड्यातील कंधार डेपोच्या नागपूरला जाणार्‍या एसटी आणि विरूद्ध दिशेने येणार्‍या टेम्पोची समोरासमोर धडक झाली.

एसटी आणि टेम्पोचा भिषण अपघात; एक ठार, बारा जखमी

उमरखेड (जि. यवतमाळ) - मराठवाड्यातील कंधार डेपोच्या नागपूरला जाणार्‍या एसटी आणि विरूद्ध दिशेने येणार्‍या टेम्पोची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एक जण जागीच ठार तर बारा जण जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता.26) दुपारी चार दरम्यान शहराजवळील मार्लेगाव फाट्यावर घडली. यातील गंभीर जखमींना प्रथम उमरखेड व नंतर नांदेड येथील शासकीय रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

संतोष गंगाधर काळबांडे (वय38, रा. हदगाव, जि. नांदेड) हा या अपघातात जागीच ठार झाला. सविता आनंद नरवाडे (वय37, रा. पिंपळगाव ता. उमरखेड), सीमा जामोदकर (वय25), रोशनी जामोदकर (वय36, दोन्ही रा. मुगट, ता. मुखेड) जनाबाई धोंडीबा कांबळे (वय60), वत्सलाबाई बळीराम काळे (वय75, दोन्ही रा. येळेगाव ता. कळमनुरी), कपिल दिलीपराव साळवे (वय29, रा. डोलारी, ता. हिमायतनगर), मारूती माधव शिंदे (वय65, रा. कुपटी, ता. माहुर), एसटीचा चालक विठ्ठल व्यंकटी मुंडे (रा.कंधार), मारुती टिकाराम नरवाडे (वय75, रा. वाटेगाव ता. हदगाव) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना प्रथम उमरखेड रूग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यापैकी विठ्ठल व्यंकटी मुंडे व मारूती टीकाराम नरवाडे यांना नांदेड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले तर टेम्पो मधील चार जखमींना हदगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले. टेम्पो बांधकाम व्यवसायातील सेंट्रिंग नेत होता. मृतक संतोष काळबांडे हा मजूर असल्याने कळते. पुढील तपास एपीआय प्रशांत देशमुख करीत आहेत.

टॅग्स :accidentdeathSTTempo