खामगाव हायवेवर एसटी बस-ट्रक मध्ये अपघात, 26 प्रवासी जखमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

अकोला वरून परत येत असतांना एसटी बसने टेंभुर्णा फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली या धडकेत एसटी बसमधील 26 प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे.सर्व जखमींना खांमगाव येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारसाठी भरती करण्यात आले आहे.

खामगाव (जि.बुलडाणा) : अकोला वरून परत येत असतांना एसटी बसने टेंभुर्णा फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली या धडकेत एसटी बसमधील 26 प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे.सर्व जखमींना खांमगाव येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारसाठी भरती करण्यात आले आहे.

आज मंगळवारी 14 जानेवारीच्या सकाळच्या दरम्यान अकोल्याच्या वरून अकोला सिंदखेडा-धुळे  ही एसटी बस खांमगावकडे  परत येत होती बसमध्ये 55 ते 60 प्रवासी होते दरम्यान परत येत असतांना खांमगाव जवळील टेंभुर्णा फाट्याजवळ इंडिका वाहनाला वाजविण्याच्या प्रयत्नात समोर येणाऱ्या ट्रक वर एसटी बसने जोरदार धडक दिल्याची माहिती मिळालीय यामध्ये एसटी बसचे समोरील भाग पूर्णपणे तुटले असून 26 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

बस अपघातांची मालिका, महिनाभरात तीन घटना
गेल्या काही दिवसांपासून बुलडाण्यात बस अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या महिनभरात झालेला हा तिसरा बस अपघात आहे. 4 जानेवारीला भरधाव एसटी बसचा स्टेअरिंग रॉड तुटून झालेल्या अपघातात 23 विद्यार्थी जखमी झाले होते.

खामगाव तालुक्यातील कोथळी गावाजवळ शनिवारी सकाळी ही घटना घडली. मलकापूर आगाराची ही बस चिचखेडनाथ येथून मोताळा येथे जात होती. धावत्या एसटी बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस रस्त्या खाली उतरून थेट शेतीच्या बांधला जाऊन धडकली. बस शेतीच्या बांधला धडकल्याने मोठा अनर्थ टळला होता.

दुसरीकडे, 03 डिसेंबर रोडी साखरपुड्यासाठी गावी निघालेल्या दिव्यांग शिक्षकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना बुलडाण्यात घडली होती. बुलडाण्यावरून खामगावकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने दिव्यांग शिक्षकाचा दुचाकीला धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: st bus accident at khamgaon buldana