कास्ट्राईब राज्य परिवहन संघटनेचे आज राज्यस्तरीय अधिवेशन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

कास्ट्राईब संघटनेचे प्रदेश अध्यक्ष भगवानराव कांडेकर यांच्या अध्यक्षतेत आयोजित या अधिवेशनात उदघाटक म्हणून विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून परिवहन मंत्री दिवाकरराव रावते, आमदार बळीराम शिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बबनराव चौधरी, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देवल, माजी व्यवस्थापकीय संचालक उत्तम खोब्रागडे, संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील निर्भवणे, अविनाश देशमुख, प्रा.संतोष हुशे, धर्मपाल ताकसांडे, रवींद्र मांडवे, एस. के. भंडारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अकोला : राज्यभरातील एसटी परिवहन महामंडळाच्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करून त्यांच्या मागण्यांना वाचा फोडणाऱ्या कास्ट्राईब राज्य परिवहन संघटनेचे शनिवार (ता.३१) स्वराज्य भवन प्रांगणात राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

कास्ट्राईब संघटनेचे प्रदेश अध्यक्ष भगवानराव कांडेकर यांच्या अध्यक्षतेत आयोजित या अधिवेशनात उदघाटक म्हणून विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून परिवहन मंत्री दिवाकरराव रावते, आमदार बळीराम शिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बबनराव चौधरी, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देवल, माजी व्यवस्थापकीय संचालक उत्तम खोब्रागडे, संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील निर्भवणे, अविनाश देशमुख, प्रा.संतोष हुशे, धर्मपाल ताकसांडे, रवींद्र मांडवे, एस. के. भंडारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या अधिवेशनात राज्यभरातील एससी, एसटी, मागासवर्गीय एसटी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित बॅकलॉग व इतर प्रश्नांना मांडण्यात येणार आहे. या अधिवेशनात सर्व मागासवर्गीय एसटी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन के.एस.शिरसाट, देवीलाल तायडे, शैलेश चक्रनारायण, किशोर इंगळे, डी.आर.ओहेकर, एम.एस,तायडे, एम.बी.अंभोरे, सी जी इंगळे, आर.एस.जाधव, टी.डब्लू .इंगळे, आ.बी.मोकळकर, आर.आर.वानखडे, एन.जी.खंडारे, एस.पी.वानखडे, पी.पी.वानखडे, ए. पी. तेलगोटे, आर.सी.पाटील, एस.एस.खरात, ए टी घुगे, वी.एन.सरकटे, एस.टी.घायवट, एम.बी.ढोरे, पी.डी.पोहरकर, ए.बी.कुटे, ए. जी. बोदडे, एन.एम.काळे, नाजीम खान, पी.व्ही.तायडे, के.जे.इंगळे, मो.इजाज, आर.पी.अवचार, जी.या. अंभोरे एस.आर.खंडारे आदींनी केले.

Web Title: ST employee conference in Akola

टॅग्स