८-९ हजारांत संसार कसा करावा रावते साहेब? 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

नागपूर - ‘‘वाढीव वेतनानंतरही किमान वेतन साडेबारा ते १३ हजारांपर्यंत जाते. कपात झाल्यावर तर ८-९ हजार रुपयेच हाती येतात. त्यात कुटुंबाचा अख्खा भार कसा पेलायचा. म्हाताऱ्या आईवडिलांना कुढे पाठवायचे? रावते साहेबांना हे समजत नाही काय?’’ असा संतप्त सवाल महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी अजय हट्टेवार आणि पुरुषोत्तम इंगोले यांनी केला.   

नागपूर - ‘‘वाढीव वेतनानंतरही किमान वेतन साडेबारा ते १३ हजारांपर्यंत जाते. कपात झाल्यावर तर ८-९ हजार रुपयेच हाती येतात. त्यात कुटुंबाचा अख्खा भार कसा पेलायचा. म्हाताऱ्या आईवडिलांना कुढे पाठवायचे? रावते साहेबांना हे समजत नाही काय?’’ असा संतप्त सवाल महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी अजय हट्टेवार आणि पुरुषोत्तम इंगोले यांनी केला.   

‘एस’टी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून स्वयंस्फूर्तीने बेमुदत संप पुकारला. वेतनवाढीनंतरही हा संप कशासाठी अशी शंका व्यक्त होत होती. त्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ संवाद’ मधून सविस्तर स्पष्टीकरण हट्टेवार आणि इंगोले यांनी केले. कर्मचाऱ्यांची कैफियत मांडतानाच त्यांनी भावनांना मोकळी वाट करून दिली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलेली वेतनवाढ फसवी आणि अन्यायकारक आहे. युती शासनाच्या तीन वर्षांच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीच्या प्रश्‍नावरच तिसऱ्यांदा संप पुकारावा लागला.

सरकारच्या हेकेखोर आणि आडमुठ्या धोरणामुळेच हा संप पुकारावा लागला. सर्वांच्याच भविष्याचा प्रश्‍न असल्यामुळे ९५ टक्के कर्मचारी सहभागी झाले आहेत. संपाच्या पहिल्या दिवशी ७० टक्के बसफेऱ्या रद्द झाल्या. दुसऱ्या दिवशी ही धग अधिकच तीव्र झाली असून ९० टक्‍क्‍यांपर्यंत फेऱ्या रद्द झाल्या. संपाचे गांभीर्य आणि कर्मचाऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न लक्षात घेता यावर लवकरच तोडगा निघावा, अशी अपेक्षाही हट्टेवार आणि इंगोले यांनी व्यक्त केली. शासनाचे धोरण खासगीकरणाला चालना देणारे असून कंत्राटदाराच्या नियुक्तीमुळे नुकसानच सहन करावे लागेल, असे मतही व्यक्त केले.  

विरोधाची कारणे
२.५७ चे सूत्र मान्य असतानाही साडेतीन हजारापैकी काहीही देण्यास नकार दिल्याने वेतनवाढीवर मर्यादा.  
३२ ते ४८ टक्के वाढीचा दावा प्रत्यक्षात १७ ते २५ टक्‍केच आहे. 
नियमित कर्मचाऱ्यांना ४ हजार ६१९ ते १२ हजार ७१ रुपये वाढीचा दावा प्रत्यक्षात ३ हजार २१६ ते ६ हजार ७३३ रुपयेच एवढाच आहे.  
कनिष्ठांना तर थकबाकीही नाही.
घरभाडे भत्ता कमी करण्याचे हे एकमेव उदाहरण.
वेतनवाढीचा दर ३ टक्के असताना दोन टक्‍क्‍यानेच वाढ.
संघटनेच्या सुत्रानूसार वेतनवाढ केल्यास ४ हजार ८४९ कोटीत योग्य वेतनवाढ.

Web Title: st employee strike nagpur news