अखेर मध्यवर्ती बसस्थानकावरील अनधिकृत जाहिरात फलक काढले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राज्यभरातील आगारांमध्ये जाहिरात प्रदर्शित लावण्यासाठी मुंबईच्या जाहिरात कंपनीशी करार करून नेमण्यात आलेले आहे. हा करार एक एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२० पर्यंत लागू आहे. तसेच बसस्थानकावर कोणतीही जाहिरात लावण्याआधी मध्यवर्ती कार्यालयाची मंजुरी घेणे बंधनकारक आहे.

अकोला : मध्यवर्ती बसस्थानकाच्या खांबावर संदेशांसह अनधिकृतपणे जाहिरात फलक लावण्यात आल्याचे वृत्त दैनिक सकाळ मध्ये (ता. २९)ला प्रकाशित झाल्यानंतर आगार व्यवस्थापकांनी हे फलक काढून टाकले. तसे आदेशच विभाग नियंत्रकांनी देऊन यासंदर्भात खुलासाही मागितला होता. आगार व्यवस्थापकांच्या या मनमानीपणाला वरिष्ठांचा चाप बसला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राज्यभरातील आगारांमध्ये जाहिरात प्रदर्शित लावण्यासाठी मुंबईच्या जाहिरात कंपनीशी करार करून नेमण्यात आलेले आहे. हा करार एक एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२० पर्यंत लागू आहे. तसेच बसस्थानकावर कोणतीही जाहिरात लावण्याआधी मध्यवर्ती कार्यालयाची मंजुरी घेणे बंधनकारक आहे. परंतु, मध्यवर्ती आगारात लावण्यात आलेले ‘श्री साई फ्लेक्स’ची जाहिरात आहे. हे जाहिरात फलक कुणाच्या परवानगीने लावण्यात आले आहेत, अशी विचारणा विभाग नियंत्रकांकडून करण्यात आली आहे. अशा जाहिराती लावताना आगार व्यवस्थापकांनी कोणाची परवानगी घेण्यात आली, याचा जाबही ते देऊ शकले नाही.

तसेच हे फलक लावल्यानंतर विभाग नियंत्रकांनी त्यांच्याकडून अहवालही मागविण्यात आला होता. हा अहवाल मागविताना विभाग नियंत्रकांनी त्यांना यासंदर्भात (ता. २३)लाच ४८ तासांच्या आत खुलासा मागितला होता. परंतु, त्यांनी खुलासा सादर न केल्याने परत त्यांना स्मरण पत्र पाठवून २४ तासांची मुदत खुलासा देण्यासाठी दिली होती, हे विशेष.

Web Title: ST stand banner in Akola