एसटीचा प्रवास झाला हायफाय प्रवाशांच्या मनोरंजनाची सोय 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

भंडारा - कधीकाळी "लाल डब्बा' म्हणून ओळखली जाणारी एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोसीसाठी वायफाय सेवा उपलब्ध करून दिली. भंडारा विभागात सहा आगारांतील लांबपल्ल्याच्या 271 बसगाड्यांत प्रवाशांना मनोरंजनाची सोय मिळाली आहे. यामुळे स्मार्ट फोनधारक प्रवाशांसाठी लांबचा प्रवास आनंदाचा झाला आहे. 

भंडारा - कधीकाळी "लाल डब्बा' म्हणून ओळखली जाणारी एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोसीसाठी वायफाय सेवा उपलब्ध करून दिली. भंडारा विभागात सहा आगारांतील लांबपल्ल्याच्या 271 बसगाड्यांत प्रवाशांना मनोरंजनाची सोय मिळाली आहे. यामुळे स्मार्ट फोनधारक प्रवाशांसाठी लांबचा प्रवास आनंदाचा झाला आहे. 

सध्या आधुनिकीकरणात "स्मार्ट'चे वारे वाहत आहे. त्यात प्रवाशांसाठी मनोरंजनासाठी वायफाय सेवा देण्यास रेल्वे पुढाकार घेतला. त्यानंतर एसटीनेसुद्धा लांबच्या प्रवासात प्रवाशांच्या मनोरंजनासाठी उपाययोजना सुरू केल्या. खासगी कंपनीच्या मदतीने बसगाड्यांत वायफाय सेवेद्वारे प्रवाशांच्या मनोरंजनाची तयारी करण्यात आली. त्यातून सर्वच विभागातील बसगाड्यांमध्ये वायफाय सेवा सुरू करण्यात आली. भंडारा विभागातील सातही आगारांतील लांब पल्ल्याच्या बसगाड्यांमध्ये ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामुळे प्रवासादरम्यान निवडक चित्रपटांचा आस्वाद घेता येतो. मात्र, त्यासाठी स्मार्ट फोनची आवश्‍यकता आहे. आतापर्यंत भंडारा आगारातील 66 बसगाड्यांमध्ये ही सोय करण्यात आलेली आहे. तसेच गोंदिया आगारातील 62, तिरोडा आगारातील 24, तुमसर आगारातील 40, साकोली आगारातील 60 आणि पवनी आगारातील 19 बसगाड्यांमध्ये प्रवाशी चित्रपटांचा आनंद घेत प्रवास करत आहेत. एसटीने प्रवाशांसाठी मनोरंजनासाठी ही सोय केली असून, येणाऱ्या काळात त्यात आणखी सुधारणा होतील असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

कार्यक्रम बघायच्या टिप्स 
एसटीद्वारे प्रवास करताना वायफायची सोय असलेल्या बसमध्ये आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन वायफाय सुरू करावा. त्यानंतर येणाऱ्या लिस्टमध्ये ज्ञर्ळींळ ची निवड करावी. सेटिंगमधून बाहेर पडून क्रोम किंवा ब्राउजर उघडावे. त्यामध्ये घर्ळींळ.लो टाइप करून एन्टर करावा. त्यानंतर निवडक चित्रपट किंवा कार्यक्रम आपल्या मोबाईलवर सुरू होतील. या सेवेबाबत बसमधील प्रत्येक सीटजवळ सुचना लावलेल्या आहेत. 

Web Title: ST travels to hi-fi