esakal | एस.टी. कर्मचाऱ्यांचे ताटवाजवा आंदोलन; ऐन दिवाळीत तीन महिन्यांचे पगार थकीत
sakal

बोलून बातमी शोधा

ST workers did protest as not get salaries yet

संघटनेचे अध्यक्ष वसंत शिकारे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात संतोष भिवापुरे, पाचभाई, चामटकर, पटले, निखारे, जाधव, खांडरे, मेश्राम, काळे, आत्राम, गजबे, डुकसे यांच्यासह शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.

एस.टी. कर्मचाऱ्यांचे ताटवाजवा आंदोलन; ऐन दिवाळीत तीन महिन्यांचे पगार थकीत

sakal_logo
By
श्रीकांत पशेट्टीवार

चंद्रपूर :  कोरोनाच्या काळात एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढावे यासाठी दिवसरात्र काम करणारे चालक, वाहक, यांत्रिकी आणि लिपिकांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. दिवाळीच्या तोंडावर मिळणारा बोनस, फेस्टिवल ऍडव्हान्सची रक्कम अद्याप हाती आली नाही. त्यामुळे बुधवारी (ता. 11) कामगार संघटनेतर्फे विभाग नियंत्रक कार्यालयासमोर ताटवाजवा आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा - आता दुपारच्या वेळी बिनधास्त झोपा; 'हे' आहेत दुपारी झोपण्याचे फायदे

संघटनेचे अध्यक्ष वसंत शिकारे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात संतोष भिवापुरे, पाचभाई, चामटकर, पटले, निखारे, जाधव, खांडरे, मेश्राम, काळे, आत्राम, गजबे, डुकसे यांच्यासह शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.

कोरोनाच्या काळात एसटी महामंडळासाठी काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आधी मे, जून आणि जुलै महिन्यांचा पगार देण्यात आला नव्हता. त्यामुळे महाराष्ट्र मोटार कामगार संघाच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी कामबंदचा इशारा दिला. मात्र, खासदार बाळू धानोरकर यांनी मध्यस्ती केली. परिवहन मंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार अदा करण्यात आले. 

सविस्तर वाचा - ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिघा भावांचे मृतदेह बघून अख्खे गाव हळहळले; तलावात बुडून झाला मृत्यू

आता ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे सात दिवस उलटून गेले तरी पगार झाले नाही. दिवाळी तोंडावर आली आहे. मात्र, हातात पैसेही नाही. अडीच हजार रुपये बोनस आणि फेस्टिलस ऍडव्हॉन्सही मिळाला नाही. थकीत पगार आणि अन्य मागण्यांना घेऊन बुधवारी (ता. 11) विभाग नियंत्रक कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी ताटवाजता आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन वरिष्ठांना देण्यात आले.

संपादन - अथर्व महांकाळ