esakal | आता श्रीखंड, पनीरचा कारखाना सुरू करा : गडकरी
sakal

बोलून बातमी शोधा

आता श्रीखंड, पनीरचा कारखाना सुरू करा : गडकरी

आता श्रीखंड, पनीरचा कारखाना सुरू करा : गडकरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : मदर डेअरीने श्रीखंड आणि पनीरच्या उत्पादनाचा मोठा कारखाना नागपुरात सुरू करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून 25 लाख लिटर दुध संकलनाचे उद्दिष्ठ मदर डेअरीने ठेवले आहे. ते पूर्ण होताच विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद होतील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
एनडीडीबी आणि मदर डेअरीच्या ऑरेंज मावा बर्फीच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री गिरिराज सिंग, नॅशनल डेअरी डेव्हलपमेन्ट बोर्डाचे अध्यक्ष दिपीर रथ, मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक संग्राम चौधरी, राज्याचे सचिव लक्ष्मीनारायण मिश्रा, माफसूचे कुलगुरु डॉ. आशिष पातूरकर, विदर्भ मराठवाडा डेअरी प्रकल्पाचे संचालक रविंद्र ठाकरे उपस्थित होते. गडकरी म्हणाले, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी शेतीतील उत्पादनासह पूरक उत्पादन वाढविण्यावर भर दिला जात आहे. विदर्भात दुधावरील अर्थव्यवस्था विकसित झाली नव्हती. मदर डेअरीच्या माध्यमातून ती विकसित करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मधाचे उत्पादन वाढविण्यावरही भर दिला जात असून त्यासाठी 100 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. याशिवाय मातीचे साहित्य, लोहार, वुडन क्राफ्ट, सोलर वस्त्रांच्या 13 क्‍लस्टरला मंजुरी देण्यात आली आहे. त्यातील एक कपड्याचे क्‍लस्टर विदर्भात सुरू करण्यात येणार आहे. मदर डेअरीने नागपूरची खास ओळख असलेल्या संत्रा बर्फीचे उत्पादन सुरू करणे याला खास महत्त्व आहे. मदर डेअरीने संत्रा बर्फी उत्पादनाला होकार दिला होता. ती आता प्रत्यक्षात उतरली आहे. देशातील 400 मोठी रेल्वेस्थानकावर आता कुल्हडमधून चहा मिळणार आहे. यामुळे कुल्हड उत्पादनाची मागणी व प्रमाण वाढेल. खादी ग्रामोद्योग व इतर संस्थांच्या माध्यमातून त्याचे यंत्रही वाटप करण्यात येणार आहे. या उद्योगाचा जीडीपी वाटा सध्या 29 टक्के आहे तो लवकरच 50 टक्‍क्‍यांवर नेण्यात यश मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला. प्रास्ताविक दिलीप रथ यांनी तर आभार संग्राम चौधरी यांनी केले.
"गोरस पाक'ची निर्मिती करा
मदर डेअरीने वर्धा जिल्ह्यातील पवनार येथील विनोबा भावे यांच्या आश्रमात उत्पादित होणाऱ्या "गोरस पाक' बिस्कीटाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने संशोधन करुन निर्मिती करावी. या गोरस पाकामध्ये गाईचे तुप आणि मधाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे सांगून देशातच नव्हे तर विदेशात मागणी असल्याचे स्पष्ट केले.
loading image
go to top