टीईटी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 एप्रिलपासून प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित- विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक - शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण हाेणे अनिवार्य आहे.

अकाेला - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (महाटीईटी) परीक्षेची तारीख ८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी २५ एप्रिलपासून आॅनलाईन अर्ज मागविण्यात येत असून ही प्रक्रिया १५ मेपर्यंत चालणार आहे. 

इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित- विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक - शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण हाेणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आॅनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहिती परिषदेच्या संकेतस्थळवर देण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचे दाेन्ही पेपर एकाच दिवशी म्हणजे ८ जुलै ला हाेणार आहे. पहिला पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजतापर्यंत चालणार आहे, तर दुसरा पेपर दुपारी २ ते दुपारी ४.३० वाजतापर्यंत राहील. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Starting TET online application process on 25th April