राज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ! 

राजेश रामपूरकर
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

नागपूर  - पांढरकवडा येथे "अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या साडेअकरा महिन्यांत 17 वाघांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. मध्य प्रदेशात अकरा महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक 23 वाघ मृत्युमुखी पडले आहेत. 

महाराष्ट्रात एक जानेवारी ते 15 नोव्हेंबरदरम्यान 17 वाघांचा मृत्यू झाला असला, तरी त्यातील तीन बछडे गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये जन्मत- मरण पावले होते. हे वाघ रेस्क्‍यू सेंटरमधील असल्याने वन विभागाकडे त्याची नोंद नसली, तरी वाघांच्या मृत्यूची संख्या 17 वर गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत वाघांच्या मृत्यूचा आकडा घसरला ही राज्यासाठी कौतुकाची बाब असली, तरी अद्याप दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. वाघांच्या सर्वाधिक मृत्यूची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात आहे. येथे आठ वाघांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रेल्वेने धडक दिल्याने मृत्यू झालेल्या तीन बछड्यांचा त्यात समावेश आहे. 

नागपूर जिल्ह्यात पाच, जळगावमध्ये दोन, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी एका वाघाचा मृत्यू झाला आहे. 23 जानेवारीला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विभागात नैसर्गिकरीत्या पहिला वाघ मरण पावला होता. आतापर्यंत फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक सात वाघ राज्याने गमावले. 

गमावलेले जीव... 

23 - मध्य प्रदेश 

17  - महाराष्ट्र 

11  - कर्नाटक 
(देशभरात आतापर्यंत एकूण 89 वाघ मरण पावले असल्याची माहिती पुढे आली आहे.) 

वर्ष मृत पावलेल्या वाघांची संख्या 
2018 (15 नोव्हेंबरपर्यंत) - 17 
2017 - 21 
2016 - 16 
2015 - 14 

मृत्यूची कारणे 
10 - नैसर्गिक 
3 - रेल्वे अपघात 
3 - रेस्क्‍यू सेंटरमध्ये जन्मानंतर मृत्यू 
1 - शिकार 

Web Title: The state lost 17 tigers in 11 months