राज्याच्या "ई-बालभारती'चा प्रकल्प देशभरात राबविणार

File photo
File photo

राज्याच्या "ई-बालभारती'चा प्रकल्प देशभरात राबविणार
नागपूर : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाद्वारे दीड वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेला "ई-बालभारती' प्रकल्प आता संपूर्ण देशात राबविण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतला आहे. मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेद्वारे (एनसीईआरटी) राबविण्यात आलेल्या "ई-पाठशाळा' प्रकल्पाला कमी प्रतिसाद मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 2019 साली एनसीईआरटीची सर्व पुस्तके "ई-बालभारती' प्रकल्पानुसार "क्‍युआर कोड'द्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बालभारतीद्वारे तयार करण्यात येणारी पुस्तके ऑनलाइन बघता यावी यासाठी "ई-बालभारती' प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती. यानुसार बालभारतीद्वारे तयार करण्यात आलेली पहिली ते दहावीच्या सर्व पुस्तकांचा समावेश त्यात करण्यात आला. मात्र, ही पुस्तके मोबाईल ऍपवर बघता यावी, त्यासाठी शिक्षणतज्ज्ञ रणजित डिसले यांच्या "क्‍युआर कोड' तंत्रज्ञानाचा वापर ई-बालभारतीमध्ये करण्यास सुरुवात झाली. आता बालभारती आणि राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून "ई-बालभारती' प्रकल्प राबविण्यात येत असून त्यासाठी बालचित्रवाणीतील उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून "ई-लर्निंग' साठीच्या साहित्याची निर्मिती करण्यात येते.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे "ई-पाठशाळा' हा प्रकल्प राबविण्यात येते. मात्र, या प्रकल्पाला देशभरातून अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. त्यातुलनेत "ई-बालभारती' प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अधिक सोपा असल्याने या प्रकल्पाला देशभरात लागू करण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला आहे. प्रकल्पानुसार "क्‍युआर कोड'द्वारे एनसीईआरटीच्या सर्वच पुस्तके उपलब्ध करून देण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. 2019 पर्यंत ते काम पूर्ण होणार असून देशभरात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.  
महाराष्ट्र, तमिळनाडू अग्रेसर
राज्यात "ई-बालभारती'च्या माध्यमातून शैक्षणिक कंटेंटची निर्मिती करण्यात येते. महाराष्ट्राप्रमाणेच तमिळनाडूही देशभरात अग्रेसर आहेत. मात्र, महाराष्ट्रातील "क्‍युआर कोड' तंत्रज्ञान अधिक प्रभावी असल्याने हा प्रकल्प देशभरात राबविण्यात येणार आहे.
पालक विद्यार्थ्यांना सोयीचे
शाळेत शिक्षकांद्वारे पुस्तकातून शिकविण्यावर भर असतो. मात्र, ई-बालभारतीमुळे मोबाईलवर पुस्तक उपलब्ध होत असल्याने घरीसुद्धा पालक आणि विद्यार्थ्यांना सोयीचे होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com