सिडकोतील जमिनींच्या सर्व व्यवहारांना स्थगिती 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

नागपूर - नवी मुंबई येथील सिडको जमीन वाटपासंदर्भात गैरव्यवहाराची न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली. 

नागपूर - नवी मुंबई येथील सिडको जमीन वाटपासंदर्भात गैरव्यवहाराची न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली. 

कोयना प्रकल्पग्रस्तांचे नवी मुंबईत पुनर्वसन करण्यात आले. ही जमीन विमानतळालगतची असल्याने यावर अनेक बिल्डरांचा डोळा होता. सरकारमधील काही दलालांच्या मदतीने ही जागा बिल्डरांना कवडीमोल भावाने देण्यात आली, यात कोट्यवधींचा गैरव्यवहार असून, यात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला होता. विधिमंडळाचे सत्र सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. मुख्यमंत्र्यांवरच थेट हल्ला करण्यात आल्याने भाजपमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाला. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जमीन व्यवहाराचा खुलासा करीत विरोधकांवरच उलट प्रहार केला. कॉंग्रेसच्या काळातच जमीन देण्यात आल्याचे सांगून सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे जाहीर केले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा केली. न्यायालयीन चौकशी होईपर्यंत या प्रकरणाशी संबंधित सर्व खरेदी, विक्री आणि हस्तांतराच्या व्यवहारास स्थगिती देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत जाहीर केले. 

Web Title: Stay on all CIDCO land transactions