टेकडी गणेश उड्डाणपूल पाडण्याच्या दिशेने पाऊल

file photo
file photo

नागपूर : गणेश टेकडी मंदिरासमोरील उड्डाणपुलाखालील दुकानदारांच्या पुनर्वसनाची प्रकिया दिवाळीनंतर सुरू करण्यात येणार असल्याचे महामेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले. टेकडी गणेश उड्डाणपूल पाडण्याच्या दिशेने महामेट्रोचे हे पाऊल असल्याचे अधोरेखित झाले. जयस्तंभ ते मानस चौकापर्यंतचा सहा पदरी रस्ता तयार करण्यात येणार आहे.
शहराचा चेहरामोहरा बदलविणाऱ्या महा मेट्रोच्या प्रस्तावित प्रकल्पाच्या कार्याला लवकरच सुरुवात होणार आहे. नागपूर रेल्वे स्थानकासमोरील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. यासाठी टेकडी गणेश उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. परंतु, हा उड्डाणपूल पाडण्यापूर्वी त्याखालील दुकानदारांचे पुनर्वसन करण्याचे आव्हान महामेट्रोपुढे आहे. महामेट्रो पुनर्वसनाची प्रक्रिया दिवाळीनंतर एका आठवड्यात पूर्ण करणार आहे. या दुकानदारांचे पुनर्वसन राज्य परिवहन महामंडळच्या जमिनीवर केले जाणार असून, या जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
जयस्तंभ ते मानस चौकापर्यंत सहा पदरी मार्गाशिवाय किंग्स्वे हॉस्पिटल ते रामझुलापर्यंत उड्डाणपुलाचे कामही प्रस्तावित आहे. यामुळे आरबीआय चौक व एलआयसी चौक येथील प्रवाशांना सेंट्रल एव्हेन्यूवर प्रवास करने सुरुळीत होईल. याशिवाय मानस चौक ते कॉटन मार्केटचौकापर्यंत भुयारी मार्गही प्रस्तावित आहे. हा भुयारी मार्ग पश्‍चिम ते पूर्व नागपूरला जोडणार आहे. त्यामुळे लोखंडी पुलावरील वाहतुकीची कोंडी सुटणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com