esakal | काय सांगता! प्रतिबंधित क्षेत्रातील सीसीटिव्हिला चोरीची वीज;  वर्धा जिल्ह्यातील नामदेव मठ परिसरातील प्रकार..  
sakal

बोलून बातमी शोधा

 Stolen electricity used for CCTV at containment zone in wardha

कोरोना रुग्ण आढळलेला परिसर १४ दिवस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर या भागात सीसीटिव्ही लावण्यात येतात. तसेच नियंत्रणासाठी काही पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. असाच प्रकार येथे घडला.

काय सांगता! प्रतिबंधित क्षेत्रातील सीसीटिव्हिला चोरीची वीज;  वर्धा जिल्ह्यातील नामदेव मठ परिसरातील प्रकार..  

sakal_logo
By
रुपेश खैरी

वर्धा : कोरोनाचा रुग्ण आढळल्याने येथील नामदेव मठ परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. या भागातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. एक झोपडी टाकून पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मात्र, सीसीटीव्हीला पुरविण्यात आलेला वीजपुरवठा हा चोरीचा असल्याचे म्हणत येथे ‘महावितरणने कारवाई करीत सीसीटीव्हीचा वीज पुरवठा खंडित केला. हा प्रकार मंगळवारी (ता. २८) दुपारच्या सुमारास घडला. 

कोरोना रुग्ण आढळलेला परिसर १४ दिवस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर या भागात सीसीटिव्ही लावण्यात येतात. तसेच नियंत्रणासाठी काही पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. असाच प्रकार येथे घडला. या दोन्ही कामासाठी प्रशासनाने नगरपालिकेच्या स्ट्रीट लाईटवरून वीज प्रवाह घेतला. याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी वीज चोरीच्या नावावर करवाई करून येथील सीसीटीव्ही बंद केले. यामुळे महावितरणच्या या कारवाईसंदर्भात सर्वत्र चर्चा सुरू आहे. 

हेही वाचा - घरात सापडलेली तांब्याची वस्तू निघाली तब्बल 1500 वर्ष जुनी; इतिहास बघितला आणि सर्वांनाच बसला धक्का..

केलेली कारवाई संयुक्तिक नाही 

शहरातच नाही तर जिल्ह्यात निर्माण करण्यात आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटवरून वीज पुरवठा घेण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. याचे अधिकार या दोन्ही संस्थांना आहे. असे असताना ‘महावितरणने केलेली कारवाई ही संयुक्तिक नसल्याचा आरोप सर्वस्तरावरून होत आहे. 

या भागात राहतात महावितरणचे बडे अधिकारी 

प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या या भागात ‘महावितरणचे एक वरिष्ठ अधिकारी वास्तव्यास आहेत. नियमानुसार प्रतिबंधित क्षेत्रातून कोणालाही ये-जा करण्यास मुभा नाही. याच कारणातून येथे जरा वाद झाल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा परिसरात सुरू होती. 

नक्की वाचा - विद्यार्थ्यांनो व्हा सज्ज! चार ऑगस्टपासून होणार तुमच्या शाळा सुरू...

अधिकार दोन्ही संस्थांना 
नगरपालिका आणि ग्रामपंचायत क्षेत्रात कंटेनमेंट झोन निर्माण केल्यास तिथे या दोन्ही क्षेत्रात स्ट्रीट लाईटवरून वीज घेण्यात येते. याचे अधिकार या दोन्ही संस्थांना आहे. असे असताना नामदेव मठ परिसरात महावितरणने कारवाई केली. या कारवाईनंतर आता प्रतिबंधित क्षेत्रात आवश्यक यंत्रणेसाठी लागणारी वीज पुरविण्यासंदर्भात महावितरणला सूचना करण्यात आली आहे. तसे आदेशच निर्गमित करण्यात येईल. 
- सुरेश बगळे 
उपविभागीय अधिकारी, वर्धा

संपादन - अथर्व महांकाळ