सिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

नागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले. जि. प.च्या खेडकर सभागृहात नागपूर ग्रामीणच्या सर्व सरपंच व सचिवांसह पाणीटंचाईची एक बैठक पालकमंत्र्यानी घेतली. या बैठकीत सर्वांसाठी घरे व पालकमंत्री पांदण योजनेचा आढावाही घेण्यात आला. या बैठकीला आमदार समीर मेघे व जि. प.चे पदाधिकारी, पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

पाणीटंचाईचा आढावा घेताना सार्वजनिक विहिरी खोलीकरण, नळयोजना दुरुस्ती, पाइपलाइन दुरुस्ती, नवीन पाण्याचे स्रोत निर्माण करणे, विंधन विहिरींची दुरुस्ती, नवीन विंधन विहिरी, विहीर खोलीकरण अशा सर्व उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. पाणीटंचाईच्या उपाययोजनांसाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. नियमात बसणाऱ्या योजनांसाठीच निधी देता येईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. पाणीटंचाईची कामे ही जि. प. आणि मजीप्राने वेळेत पूर्ण करावी. या काळात जो ग्रामसचिव गावात राहावे. जे सचिव राहणार नाही, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
बैठकीत वाडी, दवलामेटी येथील पाणीटंचाईचा मुद्दाही चर्चेला आला. वेणा जलाशयातील पाणी आता संपले आहे. त्यामुळे अंबाझरीचे पाणी वाडीला मिळावे, अशी अपेक्षा समीर मेघे यांनी व्यक्त केली. तसेच विंधन विहिरी या जुलै-ऑगस्टऐवजी फेब्रुवारीत सुरू करून एप्रिल-मेपर्यंत पूर्ण करण्यात याव्या, अशी सूचना मेघे यांनी केली.
सर्वांसाठी घरे, आक्षेप नोंदविण्यात मुदतवाढ
नागपूर तालुक्‍यात 7293 जागांवर झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण करण्यात आले आहे. यावर आक्षेप नोंदविण्याची तारीख 7 डिसेंबर 2018 होती. या तारखेला मुदतवाढ देण्यात येणार आहे. आतापर्यंत 125 आक्षेप आले आहेत. शासनाच्या निर्णयानुसार 2011 पर्यंतच्या सर्व झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात येऊन या जागा नियमित करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: Stop the work of cement roads