आठ दिवस पुरेल एवढाच औषधाचा साठा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

नागपूर : राज्यातील इएसआयसी रुग्णालयांची अवस्था वाईट झाल्याने कामगारांना हक्काच्या सुविधा मिळत नाही आहे. कामगार रुग्णालयातील डॉक्‍टरपासून तर सफाईगारापर्यंतचे 50 टक्के कर्मचारी निवृत्त झाले आहेत. उपचाराची बिले वर्षानुवर्षे मंजूर न होताच धूळखात पडून राहत असल्याने कामगारांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. आता अवघे 8 ते 10 दिवस पुरेल एवढाच औषध साठा शिल्लक असल्याने कामगार हवालदिल झाले आहेत.

कर्मचारी राज्य विमा निगम ही संस्था 1952 मध्ये अमलात आली. सुरुवातीपासून तर आतापर्यंत कामगारांच्या दरमहा वेतनातून शंभर रुपयांमागे मालकाचे 4.75 पैसे तर कामगाराचे 1.75 पैसे असे एकूण 6.50 पैसे कपात होते. कमीत कमी 21,000 पर्यंत दरमहा वेतन असलेल्या कामगार व कुटुंबीयांना या योजनेचा लाभ घेता येतो. कामगारांच्या पगारातून रक्कम कपात केली जात असली तरी सुविधेचा फारसा लाभ मिळत नाही. विदर्भासाठी नागपुरातील सोमवारीपेठेतील एकमेव राज्य कामगार रुग्णालय आहे. विदर्भातील असंघटित क्षेत्रातील कारखाने, उद्योगांमध्ये तीन लाखांवर कामगार व कुटुंबीयांच्या आरोग्याची जबाबदारी रुग्णालयावर आहे.
कामगार रुग्णालये चालविणे राज्य सरकारला तोट्याचे नाही; मात्र राज्य सरकारची इच्छाशक्ती नसल्यानेच आता राज्य कामगार विमा रुग्णालयांची सोसायटी तयार करण्यात आली. कामगारहिताच्या आरोग्य सोयी पुरवण्यात आता सोसायटीदेखील हतबल झाली आहे. सरकारी रुग्णालयांना आवश्‍यक सर्जिकल साहित्य आणि औषध खरेदीचे अधिकार हापकिनकडे दिल्याने कामगार विमा रुग्णालयात अवघे 10 दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक आहे. इंटकचे सचिव मुकुंद मुळे यांनी नाराजी व्यक्त केली करीत आठवडाभरात औषध न आल्यास आंदोलनाचा इशारा दिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Storage of only eight days of medicines