वादळी पावसाने छप्पर उडाले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

मांगलीत विज पडून दोन बैल ठार; विजपुरवठा खंडित

नागपूर - उपराजधानीसह जिल्ह्याच्या अनेक भागांत बुधवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना दिलासा दिला. रामटेक तालुक्‍यात मांगली येथे विज पडून झाडाखाली बांधलेल्या दोन बैल ठार झाले. 

मांगलीत विज पडून दोन बैल ठार; विजपुरवठा खंडित

नागपूर - उपराजधानीसह जिल्ह्याच्या अनेक भागांत बुधवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना दिलासा दिला. रामटेक तालुक्‍यात मांगली येथे विज पडून झाडाखाली बांधलेल्या दोन बैल ठार झाले. 

छत्तीसगड व आजूबाजूच्या परिसरात निर्माण झालेल्या ‘सिस्टीम’चा प्रभाव बुधवारी नागपुरात  दिसून आला. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि  बेसा, बेलतरोडी, मनीषनगर, मानेवाडासह पूर्व व दक्षिण नागपुरातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटांसह वादळी पाऊस झाला. हिंगणा व जिल्ह्यातील ग्रामीण भागांतही अनेक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्याचे वृत्त आहे. पावसामुळे दिवसभर उकाड्याने घामाघुम झालेल्या नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला. कमाल तापमानातही ४२ अंशांपर्यंत घट झाली. पावसामुळे सायंकाळच्या सुमारास हवेत सुखद गारवा पसरला होता. ढगाळ वातावरण आणखी एक-दोन दिवस कायम राहण्याची शक्‍यता, प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. नागपूर शहरालगतच्या हिंगणा, बेसा, उमरेड रोड, रामटेक, अरोली, मौदा परिसरात पाचनंतर पाऊस झाला. या वेळी काहीकाळ वीजपुरवठा खंडित झाला होता. अवकाळी पावसाच्या आगमनाने उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र, पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे.

रामटेक तालुक्‍यात जोरदार वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस झाला. मांगली येथे झाडाखाली बांधलेल्या बैलांवर वीज पडून दोन बैल ठार झाले. उन्हाळ्यात उन्हापासून बचावासाठी मांगलीचे शेतकरी गजानन दामोधर मौतकार यांनी शेतातील आंब्याच्या झाडाखाली जोडी बांधली होती. मात्र, सायंकाळी नियतीने डाव साधला. गजानन मौतकार यांच्या शेतातील झोपडी वाऱ्यामुळे जमिनदोस्त झाली. यात गजानन मौतकार यांचे जवळजवळ एक लाख रूपयांचे नुकसान झाले. पवनी येथेही जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे बाजारातील व्यापाऱ्यांची त्रेधातिरपिट उडाली. रस्त्याच्या बाजुला दूकाने लावलेल्या दुकानदारांना आपला भाजीपाला आणि इतर चिजवस्तू सांभाळतांना बरीच कसरत करावी लागली. मौदा तालुक्‍यातील धर्मापुरी येथे काही घरांचे छप्पर उडाले.

Web Title: storm rain