esakal | नागरिकांच्या सुरक्षतेसाठी ठाणेदार रस्त्यावर; नवदांपत्यांची केली कोरोना चाचणी

बोलून बातमी शोधा

नागरिकांच्या सुरक्षतेसाठी ठाणेदार रस्त्यावर; नवदांपत्यांची केली कोरोना चाचणी
नागरिकांच्या सुरक्षतेसाठी ठाणेदार रस्त्यावर; नवदांपत्यांची केली कोरोना चाचणी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महागाव (जि. यवतमाळ) : नागरिक कोरोना चाचणी करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने नागरिकांच्या सुरक्षतेसाठी महागाव पोलीस ठाणेदार विलास चव्हाण आपल्या ताफ्यासह रस्त्यावर उतरले आहे. अनावश्यक कारणासाठी बाहेर निघणार्‍या नागरिकांची आरोग्य विभागातील चमू मार्फत नागरिकांकडून कोरोना चाचणी करिता नमूने घेतले जात आहे.

हेही वाचा: गावखेड्यात मास्कविनाच जनतेचा वावर; कोरोनाच्या संसर्गाने घेरले; काणाडोळा ठरतोय घातक

विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही केल्या जात आहे. कार्यवाही दरम्यान लग्नसं मारंभ आरोपल्या नंतर परत जाणाऱ्या वरातीतील नव वधु रंजना आणि ओकार वर ओंकार यांची कोरोना चाचणी करण्यात आली .

कोरोना चा जिल्ह्यात उद्रेक झाला आहे.त्याला आळा घालण्यासाठी शासनाकडून ब्रेक दी चेन मोहीम अंतर्गत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासन पुढाकार घेत असल्याने अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांवर चाप बसला आहे.

हेही वाचा: रुग्णांकडून अतिरिक्त बील आकारणे भोवले; यवतमाळच्या सहा कोविड रुग्णालयांना नोटीस

यावेळी ठाणेदार विलास चव्हाण महसूल विभागातील मंडळाधिकारी राम पंडीत,तलाठी दीपक दिवेकर,चालक विवेक पारटकर, दिनेश आडे, गजानन राठोड, गृहरक्षक बावणे, नगरपंचायत लिपिक विष्णु कांबळे उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ