मानधनाची अट रद्द करण्यासाठी "आशां'चे मूक धरणे

file photo
file photo

यवतमाळ : "एनआरएचएम'मधील आशा व गटप्रवर्तक कर्मचारी यांना शासनाने देऊ केलेल्या तिप्पट मानधनवाढीचा शासन निर्णय काढण्यात यावा, या मागणीसाठी रविवारी (ता.15) आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी काळ्याफीती लावून शासनाच्या धोरणाचा निषेध केला.
आशा व गटप्रर्तक राज्य कृती समितीने महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्रभर आशा व गटप्रवर्तक यांचे विविध पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे. तरीदेखील शासनाने अद्याप मागणी मान्य केली नाही. शासनाने "एनआरएचएम'मधील आशा व गटप्रवर्तक कर्मचारी यांना देऊ केलेल्या तिप्पट मानधनवाढीचा निर्णय तत्काळ काढून टाका, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com