आसोली शिवारात पट्टेदार वाघ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

कोदामेंढी (जि.नागपूर ) : रामटेक आणि मौदा तालुक्‍यातील आसोली, बेरडेपार, घोटी गावशिवारात ग्रामस्थांना शनिवारी सकाळच्या सुमारास वाघाच्या पंजाच्या खुणा आढळून आल्या. पायांच्या खुणा मोठ्या असल्याने तो वाघ असावा, असा तर्क गावकरी लावत आहेत. यामुळे भीती निर्माण झाली आहे. गावकऱ्यांनी याबाबत वनविभागाला कळविले. रामटेक वनविभागाची चमू दुपारपासून या भागात दाखल होती. पंजाच्या खुणांची शहानिशा केली असता मोठ्या पट्टेदार वाघाच्या पंजाच्या खुणा असल्याचे निष्पन्न झाले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दिवसभर गस्त घातली. आसोली, बेरडेपर आणि घोटी गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोदामेंढी (जि.नागपूर ) : रामटेक आणि मौदा तालुक्‍यातील आसोली, बेरडेपार, घोटी गावशिवारात ग्रामस्थांना शनिवारी सकाळच्या सुमारास वाघाच्या पंजाच्या खुणा आढळून आल्या. पायांच्या खुणा मोठ्या असल्याने तो वाघ असावा, असा तर्क गावकरी लावत आहेत. यामुळे भीती निर्माण झाली आहे. गावकऱ्यांनी याबाबत वनविभागाला कळविले. रामटेक वनविभागाची चमू दुपारपासून या भागात दाखल होती. पंजाच्या खुणांची शहानिशा केली असता मोठ्या पट्टेदार वाघाच्या पंजाच्या खुणा असल्याचे निष्पन्न झाले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दिवसभर गस्त घातली. आसोली, बेरडेपर आणि घोटी गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या या वाघाने कोणतेही नुकसान केलेले नाही. वाघ या भागातून पुढे गेला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Striped tiger in Asoli Shivar