विदर्भात पावसाची दमदार एंट्री

अहेरी : गडअहेरी नाल्याला आलेला पूर बघताना नागरिक.
अहेरी : गडअहेरी नाल्याला आलेला पूर बघताना नागरिक.

नागपूर : गेल्या चार दिवसांपासून विदर्भात दमदार पावसाने प्रवेश केला आहे. गेल्या 24 तासांत अमरावती जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून धारणी तालुक्‍यातील सुमारे 40 गावांचा संपर्क तुटला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पहाटे एक ते दीड तास पडलेल्या पावसाने बल्लारपूर-अहेरी मार्गावर असलेल्या दहेली गावाजवळील पूलच वाहून गेला; तर दमदार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात 100 गावांचा तुटला आहे. रविवारी रात्री व सोमवार सकाळपासून मुसळधार पाऊस पडल्याने नद्या व नाले दुथडी भरून वाहत आहेत. नागपूरसह वर्धा, गोंदिया जिल्ह्यांतही चांगला पाऊस झाला.
चंद्रपूर : शनिवार, रविवारी रिमझिम बरसणाऱ्या पावसाने सोमवारी (ता. 29) चांगलाच जोर पकडला. चंद्रपूर जिल्ह्यात पहाटे एक ते दीड तास पडलेल्या पावसाने बल्लारपूर-अहेरी मार्गावर असलेल्या दहेली गावाजवळील पूलच वाहून गेला. यामुळे जवळपास चार ते पाच तास हा मार्ग बंद होता. त्यामुळे शेकडो प्रवासी अडकून होते. गोंडपिंपरी तालुक्‍यातील धाबा येथे पूल ओलांडताना सात जनावरे वाहून गेली. त्यातील दोन जनावरे बचावली. सावली येथे दोन घरांचे अंशतः नुकसान झाले. येथील गंगूबाई वनकर यांच्या घराची भिंत पडली. त्यात त्या जखमी झाल्या.
अमरावती जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून धारणी तालुक्‍यातील सुमारे 40 गावांचा संपर्क तुटला आहे. अमरावती-मोर्शी मार्गावरील पुलाचा रपटा वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. शहराच्या वडाळी परिसरात एक घर कोसळले. मेळघाटातील गडगा, सिपना, खंडू, मधवा, ताप्ती या सगळ्याच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या पावसाने धरणातील जलसाठा वाढण्याससुद्धा मदत झाली आहे. मेळघाटच्या दोन्ही तालुक्‍यात अतिवृष्टी झालेली असताना तीन तालुक्‍यांत मात्र अद्यापही केवळ हलक्‍या सरी कोसळत आहेत. अंजनगावसुर्जी तालुक्‍यातील शहानूर धरणामध्ये एकाचा मृतदेह आढळून आल्याचे वृत्त आहे. त्याचा मृतदेह काढण्याचे प्रयत्न प्रशासनाच्या वतीने सुरू होते.
गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे सोमवारी (ता. 29) अनेक मार्ग बंद झाले. भामरागड व अहेरी तालुक्‍यातील सुमारे शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. रविवारी रात्री व सोमवार सकाळपासून मुसळधार पाऊस पडल्याने नद्या व नाले दुथडी भरून वाहत आहेत. चामोर्शी तालुक्‍यातील दिना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने चौडमपल्ली नाल्याला पूर आला. यामुळे आष्टी-आलापल्ली मार्ग बंद झाला आहे. छत्तीसगड राज्यातील जगदलपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्याने इंद्रावती नदी फुगून वाहत आहे.
भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने आलापल्ली-भामरागड रस्ताही बंद झाला आहे. भामरागड तालुक्‍यातील दूरध्वनीसेवा व वीजपुरवठा ठप्प आहे. पेरमिलीजवळच्या नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने पेरमिली-भामरागड मार्ग बंद आहे. अहेरीनजीकच्या गडअहेरी पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-सिरोंचा मार्गही बंद झाला आहे. भामरागड जवळील नदीला पूर आल्याने भामरागडचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. अहेरी लगतच्या गडअहेरी नाल्याला पूर आल्याने बारा गावांचा संपर्क तालुक्‍याशी तुटला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com