विद्यार्थिनीचे अपहरण करुण तीन महीने लैंगिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

एटापल्ली : हेडरी तालुक्यातील पालेटोला गावातील मुलगी मुलचेरा येथील आश्रम शाळेत निवासी राहून इयत्ता 11वी मध्ये शिकत होती. तिचे तीन महिने सतत लैंगिक शोषण होत होते. संतोष वसंत तोरे (वय 28 रा. हेडरी) या विवाहित परुषाने तीचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी विद्यार्थिनीने (ता 17) रविवारी दुपारी 4 वाजता दिलेल्या तक्रारिवरुन एटापल्ली पोलिसांनी संतोष तोरे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीडीत विद्यार्थिनी होळी सनाच्या शालेय सुट्टया संपूण मुलचेरा येथील आश्रम शाळेत परत जात असतांना आरोपी नराधम संतोष हा हेडरी गांवापासून तिच्यावर पाळत ठेऊन पाठलाग करीत होता. एटापल्ली प्रवासापर्यंत पीडीतेचा भाऊ सोबत असल्याने तो तिला एकटी होई पर्यंत तीचा पाठलाग करीत आलापल्ली पर्यंत गेला. विद्यार्थिनी आलापल्लीला पोहचताच तिला काही आमिष दाखवून संतोष तोरे याने तिचे अपहरण करून प्रथम अहेरी येथे, नंतर सिरोंचा मार्गे तेलंगाना राज्यात तिला घेऊन गेला. त्यानंतर त्याने लग्नाचे आमिष देवून सदर विद्यार्थिनीवर सतत तीन महीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मात्र लग्न करण्यास नकार दिला.

दरम्यान मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पीडितेच्या नातेवाहिकांनी एटापल्ली व हेडरी पोलिसांकडे केली होती त्यावरून दोन्ही ठिकाणी विद्यार्थिनी बेपत्ता असल्याची नोंद करुण असून पोलिसांकडून शोध घेतला जात असतांना पीडीत विद्यार्थिनीने संतोष तोरेच्या तावडीतुन सूटुन एटापल्ली पोलिस स्टेशन गाठुन तक्रार केली. तक्रारीवरून संतोष तोरे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन जगताप यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक संजय राठोड करीत आहेत.

Web Title: Student abduction for three months sexual harassment