विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

कारंजा (घा) (जि. वर्धा) : सर्पदंशाने झोपेतच विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना नवीन दाभ्यातील आमले ले-आउटमध्ये मंगळवारी (ता. 16) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. तेजस मधुकर बन्नगरे (वय 13, रा. नवीन दाभा), असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तेजस हा मंगळवारी रात्री आपल्या राहत्या घरी मामासोबत झोपला होता. दरम्यान, त्याच्या कानाला अचानक काही तरी दंश झाल्याचे कळले. घटनास्थळी साप दिसला नसल्याने किड्याने त्याला दंश केला असावा, असा अंदाज आईवडिलांनी व्यक्त केला. मात्र रस्त्यावर चिखल असल्याने मुलाला दवाखान्यात नेण्यास विलंब झाला.

कारंजा (घा) (जि. वर्धा) : सर्पदंशाने झोपेतच विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना नवीन दाभ्यातील आमले ले-आउटमध्ये मंगळवारी (ता. 16) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. तेजस मधुकर बन्नगरे (वय 13, रा. नवीन दाभा), असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तेजस हा मंगळवारी रात्री आपल्या राहत्या घरी मामासोबत झोपला होता. दरम्यान, त्याच्या कानाला अचानक काही तरी दंश झाल्याचे कळले. घटनास्थळी साप दिसला नसल्याने किड्याने त्याला दंश केला असावा, असा अंदाज आईवडिलांनी व्यक्त केला. मात्र रस्त्यावर चिखल असल्याने मुलाला दवाखान्यात नेण्यास विलंब झाला. काही वेळाने मुलाला मळमळ व उलट्या होऊ लागल्याने त्याने आईवडिलांना माहिती दिली. त्यानंतर त्याला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र प्राथमिक उपचार सुरू असताना मुलाची प्रकृती बिघडली. काही अंतरावर गेल्यावर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिक मॉडेल हायस्कूल शाळेत शिक्षण घेत असलेला तेजस हा शिक्षणात हुशार होता. सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी श्रद्धांजली वाहून शाळेला सुट्टी दिली.
रस्ते झाले चिखलमय
शहारासह नवीन दाभ्यातील लेआउटमध्ये रस्ते पक्के नसल्याने नागरिकांना घरापर्यंत पायीच जावे लागते. काल रात्री सर्पदंश झालेल्या रुग्णाला रुग्णालयात उचलून न्यावे लागले. त्यामुळे उपचारास उशीर झाल्यानेच त्याचा मृत्यू झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The student died of snake bite