पालकांनो, तुमची संमती असेल तरच पाल्यांना शाळेत प्रवेश!

सुधीर भारती
Thursday, 19 November 2020

शिक्षणाधिकारी एजाज खान यांनी सांगितले, शासनाच्या आदेशानुसार 23 नोव्हेंबरपासून इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने शिक्षण विभाग कामाला लागला आहे.

अमरावती : येत्या 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. मात्र, पालकांची संमती असलेल्या पाल्यांनाच शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अध्यापन कार्य सुरू ठेवण्याच्या सूचना शासनस्तरावरून देण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा - इतके वैर कशासाठी? पुन्हा धानाचे पुंजणे जाळले, चार दिवसांतील दुसरी घटना

शिक्षणाधिकारी एजाज खान यांनी सांगितले, शासनाच्या आदेशानुसार 23 नोव्हेंबरपासून इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने शिक्षण विभाग कामाला लागला आहे. पालकांकडून संमतीपत्र भरून घेण्यात येणार आहे. ज्या पालकांची संमती असेल त्यांच्याच पाल्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय 17 ते 23 नोव्हेंबरपर्यंत शिक्षकांनी आपली कोविड चाचणी करणे बंधनकारक राहणार आहे. वर्गातील बैठक व्यवस्था, कोविडबाबत सुरक्षात्मक उपाय, परिसर स्वच्छता, सॅनिटायझर, थर्मल स्क्रिनिंग, मास्क, पल्स ऑक्‍सिमीटर आदीच्या व्यवस्थेबाबत 21 नोव्हेंबरला शिक्षकांची सभा आयोजित करण्यात येणार आहे.

हेही वाचा - विदेशातील गुंतवणूक भोवली, राष्ट्रवादीचा बावनकुळेंवर...

शाळेतील वर्गखोल्या तसेच कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करून घेण्यासोबतच महत्त्वपूर्ण चार तासिकांचे नियोजन करण्यात येईल. तासिकेदरम्यान सामूहिक लघु किंवा दीर्घ सुटी देण्यात येऊ नये, अशा सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी एजाज खान यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: student get entry in school if parents give permission in amravati