विद्यार्थिनीची छेड; युवकाची धुलाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

नागपूर - रेल्वे प्रवासादरम्यान विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या युवकाची अन्य प्रवाशांनी चांगलीच धुलाई केली. शनिवारी मध्यरात्रीनंतर नागपूर रेल्वेस्थानकावर ही घटना घडली.  याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नसला तरी मारहाणीत जखमी युवकाला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करावे लागले.

पीडित विद्यार्थिनी सीताबर्डी परिसरातील रहिवासी आहे. शालेय स्पर्धेसाठी ती संघासह अन्य  शहरात गेली होती. हावडा-अहमदाबाद एक्‍स्प्रेसने ती सहकारी विद्यार्थिनींसह परतत होती.  नियोजित वेळेपेक्षा साडेआठ तास उशिरा धावत होती. प्रवासादरम्यान डब्यातील एका युवकाने तिची छेड काढत असभ्य वर्तणूक केली. तिने युवकाला झिडकारून लावत झाल्या प्रकाराबाबत शिक्षक आणि मैत्रिणींना सांगितले. हळूहळू ही चर्चा डब्यातील अन्य प्रवाशांपर्यंत पोहोचली.  पीडित विद्यार्थिनी सतत रडत होती. यामुळे रोष वाढत गेला. मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास ही गाडी नागपूर स्थानकावर पोहोचताच डब्यातील प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी युवकाला बेदम मारहाण सुरू केली. माहिती मिळताच आरपीएफ जवानही तिथे पोहोचले. मात्र, प्रवाशांचा रोष लक्षात घेता, त्यांनी काहीकाळ शांत राहणे पसंत केले. सुमारे २० मिनिटे त्याची धुलाई सुरू होती. संधी मिळताच जवानांनी प्रवाशांच्या तावडीतून युवकाला सोडविले.  तोवर मुलींना घेण्यासाठी पालकही रेल्वेस्थानकावर पोहोचले. त्यांनी पोलिसात तक्रार करण्यास नकार दिला आणि विद्यार्थिनीला सोबत घेऊन गेले. गंभीर जखमी झालेल्या युवकाला मेयो रुग्णालयात नेऊन उपचार करावे लागले.

Web Title: Student Tampering during the train journey