विद्यार्थी शिकत आहेत जीव मुठीत घेऊन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

तालुक्यातील सुसुंद्रा येथील जि.प. शाळेतील वर्ग खोलीच्या छप्परला भगदाड पडल्याने विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे घेत आहे. छप्परला भगदाड पडल्याने शाळेत पावसाचे पाणी येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक  अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कारंजा (घा) - तालुक्यातील सुसुंद्रा येथील जि.प. शाळेतील वर्ग खोलीच्या छप्परला भगदाड पडल्याने विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे घेत आहे. छप्परला भगदाड पडल्याने शाळेत पावसाचे पाणी येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक  अडचणींचा सामना करावा लागत आहे.

छप्परावर असलेल्या पत्र्यांना भगदाड आहे, त्यातून पाणी तर गळतेच पण त्या कधीकाळी डोक्यावर पडेल याचा भरवसा नाही. त्यामुळे, विद्यार्थीना जीव धोक्यात टाकून शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहेत.  विद्यार्थी बसावे यासाठी तात्पुरती ताडपत्री टाकून कसेबसे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याची वरिष्ठांकडे माहिती दिली, तरी अजून यावर दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत बांधकाम मंजूर करण्यासाठी अनेकदा ग्रामपंचायतीद्वारे ठराव पाठविण्यात आले आहेत. मात्र त्याकडे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे, नाईलाजाने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात टाकून भगदाड पडलेल्या वर्गात बसावे लागते आहे छप्पर वर टाकण्यात आलेल्या ताडपत्री अनेकदा वादळी वाऱ्याने उडाल्या जाते त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे कधी काळी वरून काही पडू शकते. त्यामूळे, शिक्षण विभागाने तातडीने लक्ष घालून दुरुस्ती करावी अशी गावातील नागरिक मागणी करत आहेत.

Web Title: Students are learning in critical situation