कोण करतोय दारूविक्रीसाठी विद्यार्थ्यांचा वापर?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

देशविदेशातून या ठिकाणी पर्यटक येतात. पर्यटनासाठी परदेशातील हौसी पर्यटक येतात. अशावेळी त्यांना सर्व सुविधा आवश्‍यक असते. मात्र, दारूबंदी झाल्यापासून पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. हॉटेल व्यवसाय मोडकळीस आला आहे. यामुळे किमान पर्यटनस्थळांच्या ठिकाणी दारूबंदी नसावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

यवतमाळ : माझ्या मते सध्या तरी चंद्रपुरची दारूबंदी फसली आहे. दारुबंदीने मोठ्या प्रमाणात दारुमाफिया तयार झाले. पोलिसांच्या अंगावर गाडी चालविण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. दोन वर्षांत पकडलेल्या दारूची किमत 180 कोटींच्या जवळपास आहे, तर मग विकलेल्या दारूची किमत किती? दारूबंदीच्या काळात विद्यार्थ्यांचा वापर करण्यात आला असून ही दारूबंदी पूर्णपणे फसली, असे वक्तव्य मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. 

ते शनिवारी (ता.आठ) विश्राम भवन येथे पत्रपरिषदेत बोलत होते. पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले, गुजरातमध्ये दारूबंदी होती. मात्र, त्या ठिकाणीही ती शिथिल करण्यात आली आहे. बंदी असलेल्या ठिकाणीच जास्त मागणी होते. याहीपेक्षा बनावट दारूचा शिरकाव होतो. चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे.

देशविदेशातून या ठिकाणी पर्यटक येतात. पर्यटनासाठी परदेशातील हौसी पर्यटक येतात. अशावेळी त्यांना सर्व सुविधा आवश्‍यक असते. मात्र, दारूबंदी झाल्यापासून पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. हॉटेल व्यवसाय मोडकळीस आला आहे. यामुळे किमान पर्यटनस्थळांच्या ठिकाणी दारूबंदी नसावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

जात होते डॉक्टरकडे, वाटेत कर्दनकाळ ठरला ट्रक.. 

दारूबंदी करायचीच असेल तर राज्यभरात करा. लगतच्या राज्याच्या सीमा बंद करा. बंदी घालून हा प्रश्‍न सुटणार नसून यासाठी प्रबोधन गरजेचे असल्याचेही विजय वडेट्टीवार म्हणाले. पत्रपरिषदेला माजी आमदार विजय खडसे, देवानंद पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे, जितेंद्र मोघे, सुनील भेले, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत, आनंद शर्मा आदी उपस्थित होते. 

भटक्‍या तसेच व्हीजेएनटी, ओबीसीसाठी घोषणा 
- भटक्‍या जातीमधील विद्यार्थ्यांना पहिली ते बारावी शिक्षणासाठी नामांकीत शाळेत प्रवेश देणार 
- साडेसात हजार विद्यार्थ्यांना मिळणार लाभ 
- दुर्लक्षित समाजातील सर्व विद्यार्थ्यांची फी शासन भरणार 
- दहा हजार घरकुलांची मागणी 
- शिक्षित असलेल्या युवकांना कौशल्य विकासाचे धडे 
- "बार्टी'च्या धर्तीवर महाज्योती प्रशिक्षण संस्था


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students in liquor smuggling chandrapur