साडेतीन लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार कधी? अजूनही अर्ज प्रलंबितच

संतोष ताकपिरे
Thursday, 19 November 2020

2018-19 मध्ये 5 लाख 59 हजार 943 विद्यार्थ्यांनी शिष्यवृती तसेच फ्रिशीपसाठी अर्ज केला होता. त्यामध्ये 1 लाख 61 हजार 644 विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. 2019-20 मध्ये 4 लाख 31 हजार 60 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 25 हजार 885 विद्यार्थी वंचित आहेत

अमरावती : भारत सरकार शिष्यवृती योजनेंतर्गत राज्यातील विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायविभागाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, 2014 ते 2019 पर्यंतचे शिक्षणशुल्क, परीक्षा शुल्कबाबतचे मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शेकडो अर्ज शासनस्तरावर प्रलंबित आहेत. याप्रकरणाची भीमशक्ती संघटनेकडून राज्यपालांकडे तक्रार करण्यात आली आहे.

हेही वाचा - डिजिटल युगातही शेतकरी देतो पत्राद्वारे शुभेच्छा, ३७...

2018-19 मध्ये 5 लाख 59 हजार 943 विद्यार्थ्यांनी शिष्यवृती तसेच फ्रिशीपसाठी अर्ज केला होता. त्यामध्ये 1 लाख 61 हजार 644 विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. 2019-20 मध्ये 4 लाख 31 हजार 60 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 25 हजार 885 विद्यार्थी वंचित आहेत. फ्रीशीपची अवस्था तर यापेक्षाही वाईट आहे. 48 हजार 243 विद्यार्थ्यांपैकी केवळ सात हजार 725 विद्यार्थ्यांनाच फ्रीशीप मंजूर करण्यात आली आहे. 

हेही वाचा - पूर्व विदर्भात डॉक्टरांसह १७ कोरोना योद्ध्यांचा मृत्यू...

विशेष म्हणजे, शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरणाऱ्यांची संख्या 1 लाख 38 हजार 35 ने कमी झाल्याची धक्कादायक बाबसुद्धा समोर आली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असून शिष्यवृत्ती न मिळाल्याने अनुसूचित जाती, नवबौद्ध  तसेच शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. साडेतीन लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशा आशयाची तक्रार भीमशक्ती संघटनेचे पंकज मेश्राम यांनी राज्यपालांकडे केली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students not received scholarship from few years in amravati