विद्यार्थ्यांनी घेतला शिक्षणमंत्र्यांचा क्‍लास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

नागपूर : अधिकाऱ्यांना धारेवर धरून क्‍लास घेणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती करून त्यांचाच क्‍लास गुरुवारी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतल्याचे दिसून आले. मराठी शाळा असो वा दप्तराचे ओझे, प्रात्यक्षिक परीक्षा, शिक्षणपद्धतीवर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांनी मंत्र्यांना चांगलेच हैराण केले.

नागपूर : अधिकाऱ्यांना धारेवर धरून क्‍लास घेणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती करून त्यांचाच क्‍लास गुरुवारी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतल्याचे दिसून आले. मराठी शाळा असो वा दप्तराचे ओझे, प्रात्यक्षिक परीक्षा, शिक्षणपद्धतीवर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांनी मंत्र्यांना चांगलेच हैराण केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिकलेल्या शंकरनगर येथील सरस्वती विद्यालयात थेट संवाद उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांशी ते संवाद साधण्यासाठी आले होते. सुरुवातीला विद्यार्थ्यांना आजच्या दिवसाचे महत्त्व काय? अशी विचारणा शिक्षणमंत्र्यांनी केली. यानंतर विद्यार्थ्यांनी नववर्षात केलेल्या संकल्पांची माहिती घेतली. यानंतर एकामागून एक प्रश्‍न विचारण्यास विद्यार्थ्यांनी सुरुवात केली. हडस हायस्कूलच्या पूर्वा डहाके या विद्यार्थिनीने प्रात्यक्षिकांवर शिक्षणपद्धतीमध्ये भर का नाही, असा प्रश्‍न केला. यावर प्रात्यक्षिकांवर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे तावडे यांनी सांगितले.
मराठी भाषा इंग्रजी शाळांमध्ये सक्‍तीची करण्यावर तनया तळेगावकर हिने तर दप्तराचे ओझे कमी करण्यावर आलेल्या प्रश्‍नासाठी थेट शिक्षणाधिकारी आणि माझाशी संपर्क साधण्याचे आवाहन तावडेंनी केले. विद्यार्थ्यांना आवडीनुसार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणपद्धतीत बदल करता येईल का? अशी विचारणाही शिक्षणमंत्र्यांना केली. विशेष म्हणजे प्रात्यक्षिक गुण आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवर आधारित प्रश्‍न शिक्षणमंत्र्यांसमोर विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेत. प्रश्‍नांची एकामागून एक उत्तरे देताना शिक्षणमंत्र्यांची बरीच दमछाक झाली. परांजपे हायस्कूल, राजेंद्र हायस्कूल, हडस हायस्कूल, आदर्श हायस्कूल, जिंदल पब्लिक स्कूल, आर. एस. मुंडले, प्रतापनगर हायस्कूल, रामनगर भारत विद्यालय, रायसोनी स्कूल, महाराष्ट्र अध्ययन मंदिरसह सरस्वती हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते.  
आठवड्यात तीन तास "नो इलेक्‍ट्रिक गॅझेट'
सध्याची पिढी टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर आणि इतर गॅझेटच्या आहारी गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या सायबर गुलामीच्या विरोधात आंदोलन छेडणे काळाची गरज आहे. हे लक्षात घेता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस तीन तास कुठलेही गॅझेट वा टीव्ही न पाहता घालविण्याचे आवाहन केले.

Web Title: Students took classes of education ministers