समाजकल्याणचे फर्मान, विद्यार्थ्यांनो वसतिगृह रिकामे करा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

नागपूर : ग्रामीण भागातील मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शहरातील चांगल्या महाविद्यालयांमध्ये चांगले शिक्षण घेता यावे म्हणून त्यांच्या राहण्याच्या व्यवस्था करण्यासाठी समाजकल्याण विभागमार्फत वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. मात्र, हा विभागच आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर उठल्याचे चित्र आहे. प्रवेश दिल्यावर समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करण्याचे फर्मान सोडले आहे.

विद्यार्थी गरीब असून भाड्याने घर करण्याची आर्थिक क्षमता नाही. मालकाकडूनही घर खाली करण्यासाठी महिन्याभराचा वेळ देण्यात येत असताना समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ वसतिृगह खाली करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे अनेकांवर नागपुरातून शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. नागपूर जिल्ह्यात समाजकल्याण विभागाचे अनेक वसतिृगह आहेत. यातील काही मालकीच्या इमारतीत आहेत, तर काही भाड्याने आहेत. हजारो विद्यार्थी येथे राहून शिक्षण घेतात. या वसतिगृहात शिक्षण घेऊन अनेक जण मोठ्या पदावरही गेली आहेत. या वसतिगृहाचा फायदा विद्यार्थ्यांना झाला आहे. परंतु, समाजकल्याण विभागाने अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करण्याचे फर्मान दिले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम केल्याने इतर अभ्यासक्रमांत प्रवेश देणार नसल्याचा अजब पवित्रा या समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे आधी समाजकल्याण विभागानेच या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. त्यानंतर आता त्यांना वसतिगृह खाली करण्याचे फर्मान सोडले आहे. काही वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तत्काळ वसतिगृह सोडण्यास सांगण्यात आले आहे. हे विद्यार्थी गावखेड्यातील आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students, vacant hostel immediately