esakal | अरे व्वा ! आता क्षणात पोहचते पोलिसांपर्यंत संशयितांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

mobile.jpg

देशभरात कोरोनाचे संकट त्यात अकोला जिल्हा रेड झोनमध्ये, अशा काळात 24 तास सेवा देणाऱ्या देवदूत पोलिस विभागाकडे कमी मनुष्यबळ असतानाही प्रत्येक गावावर लक्ष ठेवता यावे, ग्रामीण भागात होणारा कोरोनाचा संसर्ग टाळता यावा, लॉकडाउन काळामध्ये गावोगावी असणाऱ्या तक्रारीचे त्वरित निराकरण करता यावे, तसेच सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या आदिवासीबहुल गावांमध्ये महत्त्वाच्या सूचना किंवा गावात कोणी संशयित रुग्णांची माहिती क्षणार्धात पोहचविल्या जाते.

अरे व्वा ! आता क्षणात पोहचते पोलिसांपर्यंत संशयितांची माहिती

sakal_logo
By
मुकुंद कोरडे

अकोट (जि. अकोला) : देशभरात कोरोनाचे संकट त्यात अकोला जिल्हा रेड झोनमध्ये, अशा काळात 24 तास सेवा देणाऱ्या देवदूत पोलिस विभागाकडे कमी मनुष्यबळ असतानाही प्रत्येक गावावर लक्ष ठेवता यावे, ग्रामीण भागात होणारा कोरोनाचा संसर्ग टाळता यावा, लॉकडाउन काळामध्ये गावोगावी असणाऱ्या तक्रारीचे त्वरित निराकरण करता यावे, तसेच सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या आदिवासीबहुल गावांमध्ये महत्त्वाच्या सूचना किंवा गावात कोणी संशयित रुग्णांची माहिती क्षणार्धात पोहचविल्या जाते.

हेही वाचा-  धोका : एका नगरेवकासह 42 पॉझिटिव्ह, एकाच दिवसातील सर्वाधिक पॉझिटिव्ह अहवाल

तब्बल 90 गावांसोबत होतो संपर्क
अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनच्या वतीने तंत्रज्ञानाचा वापर करीत अनोखा प्रयोग राबविला जात असून, अकोट ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तब्बल 90 गावांवर कोविड-19 या पोलिस विभागाच्या व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून २४ तास लक्ष ठेवल्या जात आहे. राज्यातील पोलिस विभागाचा बहुदा हा पहिलाच प्रयोग असावा. विशेष म्हणजे या व्हाट्सॲप ग्रुपमध्ये सर्व गावांमधील सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष,आरोग्य कर्मचारी व त्या गावांच्या बीटमध्ये काम करणारे पोलिस कर्मचारी असून, कुठेही सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा अन्य कुठलीही पोलिसांची मदत लागल्यास ग्रुपवर एक संदेश पाठवल्या बरोबर त्या विभागातील पोलिस कर्मचारी गावांमध्ये हजर होतो व परिस्थिती हाताळली जाते. ग्रुपच्या माध्यमातून ग्रामस्तरावर आढावा घेतला जात असून, पोलिस विभागाला अद्ययावत माहिती बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या कळत असल्याने आरोग्य व अन्य विभागामार्फत उपाययोजना करण्यास मदत होत आहे.

क्लिक करा- हे काय ? चक्क दोन पोलिसांमध्येच झाली फ्रिस्टाईल, एक होता वर्दीवर तर दुरसा सुटीवर

‘अकोट पॅटर्न’ यशस्वी
अकोट ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत सातपुड्याच्या पायथ्याशी असणारी अनेक गावे आदिवासी बहुल भागातील आहेत. याठिकाणी पोलिस विभागांकडून पाठवल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या सूचना सरपंच, पोलिस पाटील यांच्या माध्यमातून ग्रामस्तरावर पोहोचवल्या जातात. त्यामुळे अकोट तालुक्यात आतापर्यंत एकही कोरोना बाधित नसून पोलिस विभागाने राबविलेला नवतंत्रज्ञानाचा ‘अकोट पॅटर्न’ यशस्वी होताना दिसत आहे.

प्रयोग यशस्वी झाला
कोरोनाच्या संकट काळात मनुष्यबळ कमी असताना तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व गावांवर लक्ष ठेवता यावे या उद्देशाने हा प्रयोग करण्यात आला असून, या प्रयोगात यशस्वी होताना दिसत आहे.
-ज्ञानोबा फड, ठाणेदार, अकोट ग्रामीण पोलिस स्टेशन.

ग्रुप महत्त्वाचा भूमिका बजावत आहे
ग्रामस्तरावरील माहिती जलद गतीने पोलिस विभागापर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामीण पोलिस स्टेशनने बनविलेला व्हाट्सॲप ग्रुप महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
-शिल्पा सपकाळ, पोलिस पाटील, सावरा

ग्रुप मोठे पाऊल ठरत आहे
ग्रामीण पोलिसांच्या संपर्कात राहून माहितीचे आदान-प्रदान व्हावे या उद्देशाने पोलिसांनी तयार केलेला व्हाट्सॲप ग्रुप एक मोठे पाऊल ठरत आहे.
-सचिन जवंजाळ, सरपंच, सावरा.