मित्रप्रेमामुळे तिकीट कापले : सुधाकर कोहळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

नागपूर : पाच वर्षात माझे काय चुकले हे पक्षाने सांगावे? मित्रप्रेमामुळे तिकीट कापल्या जात असेल तर हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरचा अन्याय आहे, अशा शब्दात दक्षिण नागपूरचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली. उद्या बुधवारी दक्षिण नागपुरातील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असे सांगून त्यांनी बंडाचेही संकेत दिले. 

भाजपने आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी माजी आमदार मोहन मते यांना उमेदवारी घोषित केली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोहन मते यांची चांगली मैत्री आहे. या संदर्भात कोहळे यांच्याशी संपर्क साधला असता पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतानाच निर्णयावरही आक्षेप नोंदवला. हा आपल्यावर अन्यायच आहे. पाच वर्षे शहराध्यक्ष होतो. महापालिकेत सर्वाधिक 108 नगरसेवक आपल्याच कार्यकाळात निवडूण आले. लोकसभेच्या निवडणुकीतही नितीन गडकरी विजयी झाले. पक्षाला फटका बसला असे कुठलेच काम आपल्या कार्यकाळात झाले नाही. आपली उमेदवारी नाकारण्याचे कुठलेच ठोस कारण आपल्याला दिसत नाही. पक्षाच्या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसल्याचे कोहळे यांनी सांगितले. 
दक्षिणेतील भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या निर्णयावर नाराज आहेत. अनेक कार्यकर्ते आपणास भेटून गेले. त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या. त्यामुळे उद्या बुधवारी सर्वांची बैठक बोलावली आहे. सर्वांसोबत चर्चा केल्यानंतर पुढचा निर्णय घेऊ, असे कोहळे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sudhakar Kohle