एसबीआयच्या सुरक्षारक्षकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

एटीएम हॅक करुन २६ लाख पळविल्याचे प्रकरणी सुरक्षारक्षकाने आत्महत्या केली.

वरोरा/आनंदवन - चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील एका एटीएमला हॅक करुन 26 लाख रुपये पळविल्याची घटना काही दिवसांपूर्वीच उजेडास आली. यामध्ये येथील बँकेच्या सुरक्षारक्षकाने आज गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. सुरक्षारक्षकाचे नाव भूमेश्वर शालीक येलके (वय 27) असे आहे. भुमेश्वरला बुधवारीच पोलिस चौकशीसाठी बोलावण्यात आले. यानंतर आज त्याने आत्महत्या केल्यामुळे या प्रकरणात बँकेचे प्रतिनिधी सहभागी आहेत का याबाबतच्या चर्चेला पेव फुटला आहे. पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: suicide of SBIs security guard