नववर्षाच्या पहाटेला दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

उमरखेड (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील साखरा येथील युवा शेतकरी अनिल केशवराव वानखेडे (वय 35) यांनी स्वतःच्या शेतामध्ये नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून नववर्षाच्या पहाटेला विष पिऊन आत्महत्या केली. संपूर्ण विश्व नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष साजरा करत असताना तालुक्‍यातील साखरा येथील युवा शेतकरी अनिल वानखेडे यांनी मात्र सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून नववर्षाच्या सकाळच्या सुमारास विष घेतले. त्याच्यापश्‍चात आई, पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा आप्तपरिवार आहे.

टाकरखेडा संभू (जि. अमरावती) : येथून जवळच असलेल्या आष्टी येथे दादाराव भीमराव जुवार (वय 53) या शेतकऱ्याने नापिकीमुळे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.1) घडली.
अल्पभूधारक शेतकरी असलेले दादाराव जुवार यांच्याकडे 3 एकर शेती आहे. या शेतामध्ये कपाशी टाकली होती. मागील वर्षीदेखील बोंडअळीमुळे उत्पन्न झाले नाही. यावर्षीदेखील निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांना नापिकीला सामोरे जावे लागले, अशी चर्चा आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, 3 मुली, 2 मुले आहेत. मागील वर्षी दोन मुलीचे लग्न झाले होते. उसनवारी करून त्यांनी यावर्षी कसेबसे शेत पेरले. परंतु, उत्पन्नाची हमी नसल्याने आणि उसनवारीचे देणे असल्याने या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली.

Web Title: Suicides of two farmers in New Year's Evening