सुमितचा गणेश देखावा ठरला अव्वल! यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा

सूरज पाटील
Friday, 4 September 2020

यवतमाळ शहरातील मारवाडी चौकात वास्तव्यास असलेला सुमित हा दरवर्षीच विविध प्रकारचे देखावे गणेशोत्सवात साकारतो. त्याच्या देखाव्याला पर्यावरण, सामाजिक जाणीवेची जोड असते. विशेष म्हणजे यासाठी तो स्वत:च्या कल्पनेतून मांडणी करतो.

यवतमाळ : कोरोनामुळे यंदा गणेशोत्सव अतिशय साध्या पद्घतीने साजरा करण्यात आला. गणेशोत्सवानिमित्त यूप टीव्हीच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमित महेंद्र हा तरुण विजेता ठरला. लक्ष्मी, गणपती, सरस्वतीची एकत्रित मांडणी त्याने केली होती. त्याच्या यशाने यवतमाळ जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

यवतमाळ शहरातील मारवाडी चौकात वास्तव्यास असलेला सुमित हा दरवर्षीच विविध प्रकारचे देखावे गणेशोत्सवात साकारतो. त्याच्या देखाव्याला पर्यावरण, सामाजिक जाणीवेची जोड असते. विशेष म्हणजे यासाठी तो स्वत:च्या कल्पनेतून मांडणी करतो. सुमितने लक्ष्मी, गणपती, सरस्वती यांची एकत्रित मांडणी केली. यामध्ये गणपती बटुकनाथ (ब्राह्मण) स्वरूपात दाखविले. सदर गणेश मूर्ती ही त्याने स्वत: घरी बनविली. स्वत: सजावट केली.
सविस्तर वाचा - तुम्हीच सांगा नेमके कोणाच्या आदेशाचे पालन करावे; का विचारत आहे शिक्षक हा सवाल?

यंदा यूप टीव्हीच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर गणेश सजावट स्पर्धा २०२० चे आयोजन करण्यात आले होते. विविध देशांमधून स्पर्धेत एक लाख ४० हजार स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून वीस स्पर्धक निवडण्यात आले असून, देशभरातील पाच स्पर्धकांचा यामध्ये समावेश आहे. यात यवतमाळातील सुमित महेंद्रचा समावेश आहे. उर्वरित विजेते यूएसए, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, साउथ अरेबियामधील आहेत.

देशातील पाच विजेत्यांमध्ये यवतमाळचा क्रमांक
गणेश चतुर्थी स्पर्धेत देशविदेशांतील लाखो स्पर्धक सहभागी झाले होते. आपणही त्यात सहभागी घ्यावे हा विचार मनात आला. देशातील पाच विजेत्यांमध्ये यवतमाळचा क्रमांक असल्याने विशेष आनंद आहे. स्वत: घरीच डेकोरेशन केले. आमच्या घरी बसविण्यात येणाऱ्या गणपतीचे हे ५४ वे वर्षे होते.
सुमित महेंद्र
विजेता, यवतमाळ.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sumeet is a winner in Ganesh decoration competition