नागपूरचा पारा ४७.२ अंशांवर

Temperature
Temperature

नागपूर - नवतपा संपल्यानंतर आता मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या नागपूरकरांना आज उन्हाचे तीव्र चटके सहन करावे लागले. शहरात ४७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

शहरात दिवसभर अंगाची लाही लाही होत असताना सायंकाळी मात्र, काही भागात ऊन-पावसाचा खेळ चालू होता. त्यामुळे दुपारी चारनंतर थोडा गारवा जाणवल्याने नागपूरकरांना उन्हापासून थोडा दिलासा मिळाला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेला ऊन-पावसाचा खेळ आणखी काही दिवस कायम राहणार आहे. 

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टचा सर्वाधिक फटका बुधवारी नागपूरकरांना बसला. येथे ४७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. मंगळवारपेक्षा आज अधिक ऊन होते. शहरात दुपारी उन्हाचे चटके व उकाडा जाणवल्यानंतर सायंकाळी अचानक वातावरण बदलले. सायंकाळच्या सुमारास पूर्व नागपुरातील अनेक भागांत हलक्‍या सरी कोसळल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com