विदर्भात उष्ण लाटेसह वादळी पावसाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

नागपूर - अख्ख्या विदर्भात सध्या उन्हाची तीव्र लाट असली तरी, लवकरच वादळी पाऊसही धडक देण्याची शक्‍यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने येत्या शनिवारनंतर संपूर्ण विदर्भात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. 

विदर्भात उन्हाची लाट गुरुवारीही कायम राहिली. उपराजधानीत पारा अर्ध्या डिग्रीने चढून ४५ अंशांवर स्थिरावला. चंद्रपूर येथे सर्वाधिक ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. बुधवारी ४४.७ अंशांवर गेलेला ब्रह्मपुरीतील (४४.७ अंश सेल्सिअस) पारा आज दोन अंशाने घसरला. उन्हाची लाट आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे. 

शनिवारनंतर विदर्भात धूळमिश्रित वादळी पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

Web Title: summer temperature heat storm rain