उन्हाळ्यात या खेड्यांना पाणीटंचाईच्या झळा; रखरखत्या उन्हात पाण्यासाठी ते करतात पायपीट

सुगत खाडे
शुक्रवार, 22 मे 2020

तालुक्यातील बहुतांश भाग हा खारपाणपट्टात येतो. त्यामुळे अशा गावातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध व गोड पाणी मिळावे यासाठी खांबाेरा ६४ खेडी पाणी पुरवठा याेजनेअंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येताे.
सुगत खाडे
अकोला : अकोला तालुक्यातील खारपान पट्ट्यात येणाऱ्या 64 खेड्यांना तपत्या उन्हात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. संबंधित गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे घुसर जवळ ट्रान्सफार्मर जळाल्याने नागरिकांना रखरखत्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

अकोला : अकोला तालुक्यातील खारपान पट्ट्यात येणाऱ्या 64 खेड्यांना तपत्या उन्हात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. संबंधित गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे घुसर जवळ ट्रान्सफार्मर जळाल्याने नागरिकांना रखरखत्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

अकाेला तालुक्यातील बहुतांश भाग हा खारपाणपट्टात येतो. त्यामुळे अशा गावातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध व गोड पाणी मिळावे यासाठी खांबाेरा ६४ खेडी पाणी पुरवठा याेजनेअंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येताे. खांबाेरा येथील उन्नई बांधाऱ्यातून सदर पाणी पुरवठा करण्यात येताे. बंधाऱ्यात काटेपूर्णा प्रकल्पातून सोडलेले व पावसाच्या दिवसात संग्रहित केलेले पाणी साठवण्यात येते. 

हेही वाचा - अरे वा! एसटी बस धावणार, हेअर सलून उघडणार; असा ठरला 'टाईमटेबल'

64 गावांची तहान भागवणारी ही योजना जिल्हा परिषदमार्फत राबवण्यात येते. परंतु गत काही दिवसांपासून योजनेअंतर्गत अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मे महिन्यात उन्हाचा पारा वाढत असतानाचा नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ग्रामस्थांना 10 दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने त्यांचे हाल होत आहेत.

आधी पंपाची अडचण आता ट्रान्सफार्मरची
खांबाेरा बंधारा परिसरात एकूण चार पंप आहेत. त्यात 60 व 150 अश्वशक्तिच्या प्रत्येकी दाेन पंपांचा त्यात समावेश आहे. यापैकी दाेन पंप हे राखीव ( स्टॅंड बाय) असतात. या पूर्वी हे पंप बंद पडत असल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. परंतु आता ट्रान्सफार्मर जळाल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत.

ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्यात आले
खांबोरा 64 खेडी योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी उपयोगात येणारे ट्रान्सफार्मर जळाल्याने पाणी पुरवठा अनियमित होता. नुकतेच ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना आता पाणीपुरवठा सुरळीत होईल.
- अनिल चव्हाण, शाखा अभियंता, जिल्हा परिषद, अकोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In summer, these villages face water scarcity in akola district