भाजपकडून नाना पटोले यांची पोलिसांत तक्रार| suneel mendhe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole

भाजपकडून नाना पटोले यांची पोलिसांत तक्रार

भंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या स्तरात टीका करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांची खासदार सुनील मेंढे (suneel mendhe) व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. १७) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल (Complaint filed) केली आहे. ‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे वक्तव्य केले होते. यानंतर त्यांनी पलटत ‘गाव गुंडाबद्दल बोलत असल्याचे’ सांगितले होते. त्याची तक्रार करण्यासाठी नागरिक आपल्याजवळ आल्यानंतर बोलत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

काँग्रेसचे आमदार तथा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लाखनी तालुक्यात पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात बोलताना अत्यंत खालच्या स्तरात टीका केली. त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे नाना पटोले (nana patole) यांच्या वक्तव्यावर भाजप व इतर नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. खासदार सुनील मेंढे (suneel mendhe), भाजपचे पदाधिकारी मुकेश थानथराटे, रुबी चड्डा, विकास मदनकर आणि कार्यकर्त्यांनी सायंकाळी पोलिस ठाण्यात (Complaint filed) जाऊन नाना पटोले यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्याबाबत लेखी तक्रार केली आहे.

हेही वाचा: मी मोदींना मारूही शकतो व शिव्याही देऊ शकतो; नाना पटोलेंचे वक्तव्य

पटोलेंनी तोंड सांभाळून बोलावे

नाना पटोले आपल्या बेताल वक्तव्यासाठी ओळखले जातात. देशाच्या पंतप्रधानांच्या संदर्भात वादग्रस्त आणि अपमानजनक वक्तव्य करून पटोलेंनी आपली लायकी दाखवून दिली आहे. पटोलेंच्या या वक्तव्याचा निषेध करीत असून त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी पोलिसांत तक्रारी दाखल करून कारवाई करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. त्यांनी तोंड सांभाळून बोलावे. अन्यथा त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, अशी प्रतिक्रिया खासदार सुनील मेंढे (suneel mendhe) यांनी दिली आहे.

‘मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’

रविवारी सायंकाळी घेतलेल्या प्रचार सभेत नाना पटोले (Nana Patole) यांनी ‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना म्हणाले (Nana Patole), ‘मी आमच्या एका गाव गुंडाबद्दल बोलत होते, त्याच नाव मोदी आहे. तुम्हाल कोणता मोदी म्हणायचा आहे’ असा प्रश्न केला. यानंतर भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :BhandaraNana Patole