मी मोदी यांना मारूही शकतो व शिव्याही देऊ शकतो; नाना पटोलेंचे वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole and Narendra Modi

मी मोदींना मारूही शकतो व शिव्याही देऊ शकतो; नाना पटोलेंचे वक्तव्य

जेवनाळा (जि. भंडारा) : जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक (Zilla Parishad and Panchayat Samiti elections) प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात निसटता पाय मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या. सायंकाळी घेण्यात आलेल्या प्रचार सभेत नाना पटोले (Nana Patole) यांनी ‘मी मोदीला (Narendra Modi) मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे दादागिरी करणारे वक्तव्य केले आहे.

लोकसभेची निवडणूक हरल्यानंतर नाना पटोले हे ऑक्टोबर २०१९ मध्ये साकोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे परिणय फुके यांच्या प्रचारासाठी साकोली येथे आले होते. याच गोष्टीचा राग धरून नाना पटोले (Nana Patole) हे वारंवार मोदींवर वक्तव्य करीत आहे. रविवारी सायंकाळी लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे प्रचार सभेत काही नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या.

हेही वाचा: चांगले गुण देण्यासाठी विद्यार्थिनींशी संबंध ठेवायचा शिक्षक

यावेळी नाना पटोले यांनी आपली ताकद वाढली असून, ‘आपण पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांना मारू ही शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे सांगत कार्यकर्त्यांमध्ये हवा भरली. मात्र, एका राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देशाच्या पंतप्रधानानबद्दल असे वक्तव्य करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसे वाटत नाही.

मोदी सरकार लोकांना मारायला लागले

भारतामध्ये कोरोना महामारी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लोकांना मारण्यासाठी आणली. मोदी सरकार लोकांना मारायला लागले आहे. गरीब कुटुंबांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी गॅस सिलिंडर दिले व आता पुढील काळात ज्याच्याकडे गॅस सिलिंडर आहे तो सधन घोषित करण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचे वक्तव्यही नाना पटोले (Nana Patole) यांनी केले.