सुपरच्या "ऑनलाईन' सेवेला ग्रहण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः दर दोन दिवसानंतर विद्यमान सरकार आपले "डिजिटल ड्रीम्स' जाहिरातीतून बोलून दाखवते. "स्मार्ट सिटी' म्हणून राज्यातील उपराजधानीचे शहर घोषित झाले. मात्र सेवा तितकी स्मार्ट झाली नाही. विदर्भासह चार राज्यातील जनतेच्या आरोग्यावर वरदान ठरलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची टोकन पद्धती सुरू करण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा कार्यान्वित केली होती. परंतु दीड महिन्यांपासून ती ठप्प झाली आहे. कंत्राटदार दुरूस्ती करत नसल्याने रुग्णांना हाताने बनवलेली पावती बाह्‌यरुग्ण विभागात दिली जात आहे. या बेजबाबदार कंत्राटदाराला प्रशासनाने काळ्या यादीत टाकण्याची तंबी दिल्याने सर्व पुरवठादारांचे धाबे दणाणले आहेत.
सुपर स्पेशालिटी विभागात दर सोमवारी आणि गुरुवारी न्युरोलॉजी, कार्डिओलॉजी, सीव्हीटीएस, न्युरो सर्जरी इत्यादी विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्ण तपासणी होते. रुग्णाला आधी बाह्यरुग्ण विभागात नोंदणी कार्ड काढावा लागतो. हे नोंदणी कार्ड संगणकावरून थेट काढले जात होते. यामुळे एका क्‍लिकवर ही सेवा सुरू होती. यासाठी विशेष सॉफ्टवेअर लावण्यात आले होते. यासाठी
तत्कालीन विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवर यांनी टोकन सिस्टम प्रणाली कार्यान्वित केली होती. आमदार प्रा. अनिल सोले यांनी आमदार निधीतून 12 लाख रुपयांचा निधी दिला होता. परंतु ही यंत्रणा काही महिन्यातच बंद पडली. याचा फटका आता बाह्यरुग्ण विभागातील पावत्या तयार करण्याला बसला आहे. सॉफ्टवेअर करप्ट झाले आहे. दुरुस्तीसाठी सुपरकडून संबंधित कंत्राटदाराला बरेच स्मरण पत्र देण्यात आले.


डॉक्‍टरांना मनस्ताप
सुपरमधील विविध विभागांतील डॉक्‍टरांना या प्रणालीत किती रुग्णांची नोंद झाली. त्याच्या तपासणीसंदर्भातील संपूर्ण माहिती संगणकावर उपलब्ध होते. त्यामुळे कामाच्या अंदाजानुसार वेळेचे नियोजन करत डॉक्‍टरांकडून सेवा दिली जाते. ही प्रणाली बंद पडली. यामुळे रुग्णांची नेमकी संख्या मिळत नाही. बरेचदा रुग्ण तपासणीस जास्तच विलंब झाल्यास रुग्णांना दुसऱ्या दिवशी या असे सांगण्यात येते. तज्ज्ञांच्या ऐवजी कनिष्ठ डॉक्‍टरांकडून उपचारावरच वेळकाढूपणा सुरू आहे. तर काही प्रामाणिक डॉक्‍टरांना तपासणीसाठी जास्त वेळ थांबावे लागत आहे.

संबंधित कंत्राटदाराला सॉफ्टवेअर दुरुस्तीसाठी वारंवार पत्र देण्यात आले. मात्र कंत्राटदाराने दुरुस्ती केली नाही. अखेर या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या भीतीने त्यांच्याकडून दुरूस्ती होईल, असे सांगण्यात आले.
- डॉ. मिलिंद फुलपाटील, विशेष कार्यअधिकारी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com