आश्‍चर्य! मोटारविना बोअरवेलमधून निघतेय पाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

वाडी (जि. नागपूर) : वाडी खडगाव मार्गावरील पाटणे टाउन येथील ले-आउटमध्ये तीन दिवसांपासून मोटार न लावताच बोअरवेलमधून पाणी येत आहे. नागरिकांचे येथे जाणे-येणे सुरू केले असून, आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत.

वाडी (जि. नागपूर) : वाडी खडगाव मार्गावरील पाटणे टाउन येथील ले-आउटमध्ये तीन दिवसांपासून मोटार न लावताच बोअरवेलमधून पाणी येत आहे. नागरिकांचे येथे जाणे-येणे सुरू केले असून, आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, लावा ग्रामपंचायत क्षेत्राअंतर्गत पांढऱ्या गोडाऊनच्या मागे पाटणे टाउन ले-आउट आहे. या ले-आउटमध्ये बांधकाम सुरू असून, भूखंड मालकाने दोनशे फूट बोअरवेल खोदली आहे. त्यात पाइप टाकून पाणी ओढण्यासाठी पंप ही बसविला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. परंतु, शुक्रवारी दिवसभर पाणी वाहत असल्याचे दिसताच नागरिकांनी आश्‍चर्य व्यक्त करायला सुरुवात केली. ही बातमी हव्यासारखी पसरताच नागरिकांची पाहण्यासाठी गर्दी होत आहे. बोअरवेलच्या आतमध्ये पाण्याचा संचय अधिक व दबाव निर्माण झाल्याने पाणी आपोआप बाहेर येण्याची संभावना व्यक्त केली जात आहे. तरीसुद्धा भूगर्भ विभागासाठी हा शोधाचा विषय निश्‍चित होऊ शकतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Surprise! Without the motor, water is coming out of the bore well