विद्यापीठाकडून एलईसीला स्थगिती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बी.एड. महाविद्यालयांच्या पाहणीसाठी गठित केलेल्या स्थानिक निरीक्षण समितीच्या निरीक्षणाला स्थगिती दिली. यासह विद्यापीठाकडून मान्यता घेणाऱ्या बी.एड. महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन अनिवार्य असणारी अट रद्द करण्यात आली. त्यामुळे अनेक बी.एड. महाविद्यालयांना दिलासा मिळाला आहे. 

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बी.एड. महाविद्यालयांच्या पाहणीसाठी गठित केलेल्या स्थानिक निरीक्षण समितीच्या निरीक्षणाला स्थगिती दिली. यासह विद्यापीठाकडून मान्यता घेणाऱ्या बी.एड. महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन अनिवार्य असणारी अट रद्द करण्यात आली. त्यामुळे अनेक बी.एड. महाविद्यालयांना दिलासा मिळाला आहे. 

बी.एड. महाविद्यालयांना नामांकन देण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे "क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया' या खासगी संस्थेला नेमण्यात आले आहे. यामुळे आता महाविद्यालयांचे मूल्यांकन मंत्रालयाच्या "राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन संस्थे'कडून (नॅक) होणार नाही. मात्र, नव्या संस्थेच्या अटी आणि महाविद्यालयांना त्यासाठी द्यावे लागणारे शुल्क बरेच अधिक असल्याने यासंदर्भात शेकडो महाविद्यालयांद्वारे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही, विद्यापीठाने बी.एड. महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी नव्याने "एलईसी' तयार करून संस्थेमध्ये "नॅक' नसल्यास त्यांना संलग्नीकरण मिळणार नाही, हा निकष टाकला आहे. मात्र, प्रकरणावर निकाल येईपर्यंत महाविद्यालयांना कुठल्याच संस्थेचे "ऍक्रीडिटेशन' घेता येणे शक्‍य नाही. त्यामुळे विभागातील महाविद्यालयांनी त्यासाठी अर्ज केलेला नाही. याच निकषाचा आधार घेत, विद्यापीठाने महाविद्यालयांना संलग्नीकरण देण्यास नकार दिला होता. अनेक महाविद्यालयांवर बंद होण्याची वेळ आली होती. याविरोधात बी. एड. महाविद्यालयांच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाला वेळोवेळी निवेदन देत निकषात बदल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे विद्यापीठाने बी. एड. महाविद्यालयांना मान्यता देण्याच्या नियमांवर अधिष्ठात्यांच्या बैठकीत फेरविचार करण्यात आला. आता बी. एड. महाविद्यालयांसाठी पदव्युत्तर शिक्षक देणे ही अटही रद्द करण्यात आली. स्थानिक चौकशी समितीच्या पाहणीला (एलईसी) तूर्तास स्थगिती देण्यात आली. याशिवाय नॅकचे मूल्यांकन अनिवार्य राहणार नसल्याने महाविद्यालयांना दिलासा मिळणार आहे. 

Web Title: Suspension of ElC from University