esakal | चंद्रपूर : जादूटोणाच्या संशयावरून आणखी तिघांना मारहाण; पाच जणांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रपूर : जादूटोणाच्या संशयावरून आणखी तिघांना मारहाण

चंद्रपूर : जादूटोणाच्या संशयावरून आणखी तिघांना मारहाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागभीड (जि. चंद्रपूर) : जिवती तालुक्यातील वणी खुर्द येथे जादुटोण्याच्या कारणावरून काही जणांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथेही जादुटोणा केल्याच्या संशयावरून एकाच कुटुंबातील तिघांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणाची तक्रार बुधवारी (ता. १) इंदिराबाई कामठे यांनी पोलिसांत केली. तक्रारीवरून पोलिसांनी प्रमोद सडमाके, सीताराम सडमाके, मयुरी सडमाके, पिल्ला आत्राम आणि आणखी एकावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

नागभीड तालुक्यात मिंडाळा (टोली) हे गाव येते. या गावात कामठे कुटुंब राहतात. हे कुटुंब जादुटोणा करीत असल्याचा संशय गावातील सडमाके कुटुंबीयांना होता. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते चार वाजतादरम्यान प्रमोद सडमाके, सीताराम सडमाके, मयुरी सडमाके, पिल्ला आत्राम आणि मयुरी सडमाके हिची आई कामठे यांच्या घरी आले.

हेही वाचा: खासदार नवनीत राणा यांच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी

जादुटोणा करता या कारणावरून पाचही जणांनी आई इंदिराबाई कामठे, मुलगी यशोदा कामठे हिला लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी मुलगा अशोक कामठे हा नागभीडला गेला होता. त्याला तेथून पिल्ला आत्राम आणि प्रमोद सडमाके यांनी मिंडाळा (टोली) गावात आणले. गावातील निकेश सडमाके याच्या घरासमोरील असलेल्या पाण्याच्या टाकीच्या लोखंडी अँगलला दोरीने बांधून त्यास बॅट, बांबूच्या काठीने मारहाण केली.

कोणतेही साधन नसल्याने कामठे कुटुंब पोलिस ठाणे गाठू शकले नाही. मात्र, बुधवारी (ता. १) तिघांनी नागभीड पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. घटनेची गंभीर दखल घेत प्रमोद सडमाके, सीताराम सडमाके, मयुरी सडमाके, पिल्ला आत्राम आणि आणखी एकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे यांनी गावाला भेट दिली. गावात शांतता राखण्याचे आवाहन केले. या घटनेचा तपास ठाणेदार मडामे करीत आहे.

हेही वाचा: भंडाऱ्याचा तरुण झळकणार प्रो-कबड्डीत; आकाशची बोली १७ लाख

जिवतीच्या प्रकरणात ३७ अटकेत

जिवती तालुक्यातील वणी खूर्द येथे जादुटोण्याच्या कारणावरून काही जणांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणात आतापर्यंत ३७ आरोपींना अटक करण्यात आली. नऊ आरोपींना जामीन मिळाला आहे.

loading image
go to top