'स्वाभिमानी'चा बुलडाण्यात सेंट्रल बँकेवर राडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

मलकापूर : पीक कर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यास निलंबित करावे, या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या फलकास काळे फासून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पिककर्जाच्या बदल्यात शेतकऱ्यांच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी दाताळा सेंट्रल बँकेचे मॅनेजरने केल्याची घटना घडली.  या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात या घटणेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. सेंट्रल बँकेच्या दाताळा येथील शाखेसमोर निदर्शने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली.

दाताळा सेंट्रल बँकेचे 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी बोर्ड फाडले आणि बँकेच्या ऑफिसला सर्व बाजूंनी काळे फासले. देवेंद्र भुयार, राणा चंदन, प्रदीप शेळके यांच्यासह कार्यकर्त्यांना मलकापूर पोलिसांनी केली अटक केली आहे. बँक मॅनेजर राजेश हिवसेला नोकरीतून बडतर्फ करा व अटक करून कारवाई करा अन्यथा सेंट्रल बँकेचा कारभार चालू देणार नाही अशी मागणी स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी केली.

Web Title: swambimani sanghatana agitation at central bank