मरणाच्या दारातून स्वप्निल आला परत

file photo
file photo

नागपूर : "डॉक्‍टर डे'च्या पर्वावर सर्वत्र डॉक्‍टरांचा जल्लोष सुरू असताना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागात डॉक्‍टरांची चमू कर्तव्यावर होती. या डॉक्‍टरांनी शर्थीचे प्रयत्न करून 35 वर्षीय तरुणाची हृदयविकारापासून सुटका करीत त्याला मरणाच्या दारातून परत आणले.
विशेष म्हणजे, कोणते कागदी घोडे न नाचवता थेट उपचाराला सुरुवात केल्याने अवघ्या काही तासांत एन्जिओग्राफीसह ऍन्जिओप्लास्टी करण्यात आली. हृदयरोग विभागप्रमुख डॉ. मुकुंद देशपांडे, सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनील वाशीमकर, डॉ. पी. पी. देशमुख यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळेच युवकाला जीवदान मिळाले.
स्वप्निल नागदेवते असे युवकाचे नाव आहे. सकाळी 10 वाजता तो हृदयरोग विभागात आला. प्रचंड घाम फुटला होता. छातीपासून तर पाठीचा भाग दुखत असल्याचे सांगत होता. कार्ड काढले. परंतु, बराच वेळ होता. अचानक हृदयाची रक्ताभिसरण प्रक्रियाच थांबल्यासारखी झाल्याचे जाणवले आणि बाह्यरुग्ण विभागातील डॉक्‍टरांनी धाव घेतली. त्याचा श्‍वास थांबला होता. हृदयाचे पम्पिंग 20 वर आले होते. परंतु, सुपरच्या हृदय विभागात तत्काळ ऍन्जिओग्राफी करण्यात आली. 90 टक्के ब्लॉकेजेस असल्याचे निदान झाले. कागदोपत्री कारवाईत न अडकल्याने सुपरच्या डॉक्‍टरांना स्वप्निलचे हृदय जिंकण्यात यश आले. एन्जिओग्राफीनंतर अल्पावधीतच ऍन्जिओप्लास्टी केली. सध्या सुपरच्या आयसीयूत तो भरती आहे. डॉ. मुकुंद देशपांडे, सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनील वाशीमकर, डॉ. प्रदीप देशमुख यांच्यासह डॉ. महेंद्र मस्के, डॉ. प्रफुल्ल, डॉ. पवन यांनीही साथ दिली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून प्रकरण मंजूर होईल. मात्र, नियतीच्या जीवनमरणाच्या खेळात सुपरच्या डॉक्‍टरांनी हृदय जिंकण्याचा किमया केली. काही दिवसांपूर्वी 24 तासांत तीन युवकांना जीवनदान दिले होते.
डॉक्‍टर प्रत्येक रुग्णाचा जीव वाचवण्यासाठीच प्रयत्न करतात. सुपरमध्ये गेल्या 25 वर्षांपासून डॉक्‍टरांची अविरत सेवा सुरू आहे. स्वप्निलचा जीव वाचला, याचे सर्वाधिक समाधान आहे.
-डॉ. मुकुंद देशपांडे, हृदयरोग विभागप्रमुख, सुपर स्पेशालिटी, नागपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com