स्वाइन फ्लूबाधितांचा आकडा फुगतोय 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

नागपूर - उपराजधानीत स्वाइन फ्लू गतीने वाढत आहे. एकाच दिवशी आणखी सात जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाली असून आता नागपूर विभागातील स्वाइन फ्लूबाधितांची संख्या सुमारे 220 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडाही फुगत आहे. 

नागपूर विभागात दिवसागणिक स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. सर्वाधिक रुग्ण नागपूर शहरात दिसतात. शहरातील रुग्णांच्या नातेवाइकांना टॅमिफ्लूसह इतर औषधाचा डोस देण्यात महापालिकेचे अधिकारी नापास झाल्यामुळेच स्वाइन फ्लू बाधितांचा आकडा फुगत असल्याचे दिसून येते. स्वाइन फ्लूची लागण झाल्यानंतर नातेवाइकांना मोठ्या प्रमाणात हा आजार होत आहे. एकाच घरातील दोघे तिघे या विळख्यात अडकत आहेत. शहरात रुग्ण वाढत असतानाही त्यावर नियंत्रणासाठी कोणताही ठोस कार्यक्रम महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून राबवला जात नाही. आरोग्य विभागाकडून उन्हाळ्यात तापमान वाढल्यावर रुग्ण कमी होणार असल्याचा दावा होत आहे. मात्र, उलट रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयात बुधवारी स्वाइन फ्लूवर आढावा बैठक झाली. सार्वजनिक आरोग्य विभागासह नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारीही सहभागी झाले होते. 

Web Title: swine flu is growing rapidly