काय? सय्यदला गुजरात एटीएसला सोपोवणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

नागपूर : उत्तर प्रदेशातील हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी हत्याकांडात आतापर्यंत सहा आरोपींना गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली. हत्याकांडात नागपुरातील सय्यद असीम अली (29, रा. जाफरनगर) याचाही समावेश आहे. नागपूर एटीएसने सय्यद अलीची कसून चौकशी सुरू केली असून, गुजरात एटीएसच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद अली हा नागपुरात हार्डवेअरचा व्यवसाय करतो. तो सुफीझमचा पुरस्कर्ता असून, कमलेश तिवारी यांच्याविरोधात यू-ट्यूबवर धमकी असलेला व्हिडिओ शेअर केला होता. सय्यद अली हा "सुन्नी युथ विंग' या संघटनेचा संस्थापक सदस्य आहे. तसेच तो "मायनॉरिटी फ्रंट' या पक्षाचा नेता असल्याचा दावा करीत आहे. 
कमलेश तिवारी यांनी काही वर्षांपूर्वी प्रेषिताबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. नागपुरात मुंबई एटीएसचे पथक पोहोचले असून, चौकशी करीत आहे. कमलेश तिवारी यांच्या हत्याकांडापूर्वी लखनौ शहरातून सय्यद अलीला फोन आले होते. हत्याकांडानंतरही फोन आल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेश एटीएसचे पथक सोमवारी सकाळी येणार आहे. 
आणखी एका संशयिताला अटक 
कमलेश तिवारी हत्याकांडात नागपुरातील आणखी एक युवक सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. अब्दुलभाई असे त्याचे नाव असल्याची माहिती आहे. अब्दुलचा हत्याकांडाशी नेमका काय संबंध आहे, याची अद्याप माहिती मिळाली नाही. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Syed will hand over to Gujarat ATS