366 आमदारांना टॅब

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

विधिमंडळ झाले एसी : सहा कोटींचा खर्च
नागपूर - विधिमंडळाच्या कामकाजाची पेपरलेसच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. याकरिता सर्व आमदारांना टॅब देण्यात येणार आहेत. आमदारांना टॅब देणारे महाराष्ट्र हे देशातील तिसरे राज्य असेल.

विधिमंडळ झाले एसी : सहा कोटींचा खर्च
नागपूर - विधिमंडळाच्या कामकाजाची पेपरलेसच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. याकरिता सर्व आमदारांना टॅब देण्यात येणार आहेत. आमदारांना टॅब देणारे महाराष्ट्र हे देशातील तिसरे राज्य असेल.

विभानसभेत 288 तर विधान परिषदेत 78 सदस्य आहे. या सर्व सदस्यांना प्रथमच टॅब देण्यात येणार आहेत. यासाठी विधिमंडळाकडून खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षीपासून विधिमंडळात "वायफाय'ची सुविधा सुरू करण्यात आले. यंदा टॅब "चार्ज' करण्यासाठी बैठकीच्या ठिकाणी विशेष सुविधा करण्यात येत आहे. आमदारांना सर्व माहिती टॅबच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. यामुळे काम अधिक गतीने होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. येथील बैठकीची व्यवस्थाही बदलण्यात येत आहे. सिटही नवीन लावण्यात येत आहे. सभागृहात "एसी' लावण्यात येत आहे. आतापर्यंत "डक्‍ट'च्या माध्यमातून सभागृह वातानुकूलित करण्यात येत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय इंदूरकर यांनी सांगितले. आता एसी लावण्यात येणार आहे. यावर साडेतीन कोटींचा खर्च करण्यात आला. विधानसभेची सिलिंग फार जुनी असून पीओपीचा पावडर पडत होते. सिलिंगही दुरुस्त करण्यात आले. यावर अडीच कोटींचा खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: tab gives to mla