शिक्षण विभागातील टेबल, खुर्च्यांची शिक्षकांकडून तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

गोंदिया : महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या वतीने वेतनाच्या मागणीसाठी शाळा बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे विनाअनदानित शाळांतील विद्यार्थ्यांनी मंगळवारी (ता. 20) जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभाग गाठून शिक्षणाधिकाऱ्यांना शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सांगितले. यावर शिक्षणाधिकारी कच्छवे यांनी विनाअनुदानित शाळेत प्रवेश घेऊ नका, असे म्हटले. ही माहिती विद्यार्थ्यांनी आंदोलक शिक्षकांना दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांनी माफी मागावी, असे म्हणत माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात घुसून टेबल, खूर्च्यांची तोडफोड केली.

गोंदिया : महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या वतीने वेतनाच्या मागणीसाठी शाळा बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे विनाअनदानित शाळांतील विद्यार्थ्यांनी मंगळवारी (ता. 20) जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभाग गाठून शिक्षणाधिकाऱ्यांना शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सांगितले. यावर शिक्षणाधिकारी कच्छवे यांनी विनाअनुदानित शाळेत प्रवेश घेऊ नका, असे म्हटले. ही माहिती विद्यार्थ्यांनी आंदोलक शिक्षकांना दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांनी माफी मागावी, असे म्हणत माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात घुसून टेबल, खूर्च्यांची तोडफोड केली. शिवाय जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. त्यामुळे या परिसरातील वातावरण तापले होते.
शाळा बंद आंदोलनाअंतर्गत महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या वतीने मोर्चा, धरणे, रास्तारोको, विरूगिरी असे अनेक आंदोलने करण्यात आली. शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. तरी निद्रीस्त शासन, प्रशासन तोडगा काढण्यास पुढे येत नाही. शाळा बंद असल्याने शेकडो विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे मंगळवारी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभाग गाठले. शिक्षणाधिकारी कच्छवे यांना भेटले. शाळेत शिक्षक नाहीत. त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असे सांगितले. यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी विनाअनुदानित शाळेत प्रवेश घेऊ नका, असे म्हटले. हीच बाब विद्यार्थ्यांनी आंदोलक शिक्षकांना सांगितली. त्यामुळे संतप्त शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांनी माफी मागावी, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाचे कार्यालय गाठले. शिक्षणाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. या वेळी झालेल्या वादात कार्यालयातील टेबल, खुर्च्यांची तोडफोड केली. शिवाय जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. दरम्यान, प्रकरण वेगळे वळण घेत असल्याचे लक्षात येताच गोंदिया ग्रामीण पोलिसांनी दीडशेच्या वर आंदोलक शिक्षकांना ताब्यात घेतले. या वेळी जिल्हा परिषदेच्या परिसरातील वातावरण चांगलेच तापले होते.

विनाअनुदानित शाळेत प्रवेश घेऊ नका, असे शिक्षणाधिकारी म्हणाल्याचे विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितले. त्यामुळे आम्ही आंदोलक शिक्षक शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, यासाठी शिक्षण विभागाच्या कार्यालयात गेलो होतो. या वेळी फक्त रोष व्यक्त केला. कार्यालयातील कोणत्याही साहित्यांची तोडफोड केली नाही.
- प्रा. पी. पी. मेहर,
सचिव, विनाअनुदानित उच्च माध्यमिक कृती समिती, गोंदिया.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tables in education section, chairs broken by teachers